*खोडवा सावरगांव सेवा सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा धुव्वा*



*सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन*


परळी  । दिनांक २४।

   खोडवा सावरगांव सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित  पॅनेलचा धुव्वा उडवत भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 


  तालुक्यातील खोडवा सावरगांव    सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली श्री वडमाऊली माता जनसेवा  पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते.  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र भाजप प्रणित पॅनलने राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १३ जागांवर  दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - गोदाबाई दहिफळे, तुळशीराम दहिफळे, अनंत उर्फ विठ्ठल दहिफळे, वैजनाथ 

दहिफळे, वैजनाथ लक्ष्मण दहिफळे, संदीप दहिफळे, विनायक मुंडे, भगवान राठोड, चांगदेव दहिफळे, शिवलिला दहिफळे, रेणूका माळवे, मच्छिंद्र कांबळे, मीराबाई आटुळे

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार