MB NEWS- *पंकजाताई मुंडे देणार परळीतील स्थानिक कलाकार अन् महिलांच्या कलागुणांना वाव !*

 *पंकजाताई मुंडे देणार परळीतील स्थानिक कलाकार अन् महिलांच्या  कलागुणांना वाव !*

    


*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने  गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवाचे आयोजन*


*विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह मिळणार आकर्षक बक्षिसं ; ३० ऑगस्टपर्यंत नांव नोंदणी करण्याचं आवाहन* 


परळी ।दिनांक २४। 

स्थानिक कलाकार आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव देणारा गौरी गणपती स्पर्धा महोत्सव  यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवातंर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह विविध आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. स्पर्धेसाठी ३० ऑगस्ट पर्यंत नांव नोंदणी करावी असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व द टर्निंग पाॅईटच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


 शहरात चांगल्या प्रकारे सांस्कृतिक चळवळ रूजावी तसेच स्थानिक कलाकार आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम  सुरू केलेला आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे हा उपक्रम घेता आला नव्हता पण आता यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने हया स्पर्धा घेण्यात येत आहेत.  


      या स्पर्धा महोत्सवा अंतर्गत बाल गणेश मंडळ, घरगुती गणेश सजावट, महालक्ष्मी मखर सजावट आणि देखावा, मंगलमूर्ती मिरवणूक देखावा या स्पर्धा होणार आहेत. महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस  डबल डोअर फ्रिज, द्वितीय मायक्रोवेव्ह, तृतीय स्मार्ट फोन तर दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना टोस्टर देण्यात येणार आहे. बाल गणेश मंडळ स्पर्धेसाठी प्रथम- नऊ हजार रुपये, द्वितीय सात हजार व तृतीय चार हजार रुपये तर उत्तेजनार्थ दोन हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे तर घरगुती गणेश सजावट आणि मंगलमुर्ती मिरवणूक देखावा स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ९ हजार, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ ३ हजार रूपये बक्षिसं दिली जाणार आहेत.  सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे.  स्पर्धेसाठी नांव नोंदणी आवश्यक असून त्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे. 


*नांव नोंदणी इथं करावी*

--------------

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी नांव नोंदणीसाठी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे.पंकजाताई मुंडे यांचे संपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट 9822478122, आश्विन मोगरकर 9833702676, राजेश कौलवार 9860230911, प्रितेश तोतला 9422328952, राहूल घोबाळे 9881321212, नरेश पिंपळे 9527642084, बंटी सातपुते 9922073540, अनिश अग्रवाल 9822291637, वैजनाथ रेकणे 9420023024, प्रल्हाद सुरवसे 9511321111, गोविंद मोहेकर 9822559458, श्रीनिवास राऊत 9403919786, सुशील हरंगुळे 7020888903, सुचिता पोखरकर 9011994938, शीतल वाघमारे 9049009578, योगेश पांडकर 9823775044, पवन तोडकरी 9623756444, विजयकुमार खोसे 9822797899, विकास हालगे 9623851212, बाळू फुले 7720967777, किशोर केंद्रे 9028282128


*सांस्कृतिक चळवळीला चालना*

---------------------------

या स्पर्धांना दरवर्षीच मोठा प्रतिसाद मिळतो. या माध्यमातून स्पर्धक विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात. स्ञी-भ्रुण हत्या, व्यसनमुक्ती, दुष्काळ, पाणी वाचवा, वाढती बेरोजगारी आदी विषयांवर जनजागृती करण्याचे काम यातून केले गेले आहे. गणेशोत्सवाच्या काळात  डाॅल्बी आणि नाचगाण्यांची संस्कृती रूजविण्यापेक्षा सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम पंकजाताई मुंडे यांनी सुरू केला आहे. आतापर्यंत झालेल्या अशा स्पर्धामधून शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढण्यास मदतच झाली आहे, त्यामुळे   स्पर्धकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !