युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 सिनेस्टाईल पैशांची बॅग पळवली



गेवराई ....

 : महिला बचत गटांची रक्कम जमा करुन बीडला येत असलेल्या आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याची पिशवी पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी गेवराई – बीड महामार्गावर घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक मागावर गेले आहे.


बीड येथील आयडीएफसी बँकेच्या शाखेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ रा. माटेगाव ( ता. बीड ) हे नेहमी प्रमाणे पाचेगाव ( ता. गेवराई ) येथून महिला बचतगटांची रक्कम वसूल करून ती शाखेत भरण्यासाठी बीड येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येताना. गेवराई -बीड महामार्गावर पाडळसिंगी जवळ आले असता पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोघे जण होते. त्यांनी दुचाकी जवळ आणून पैशांची पिशवी हिसकावून घेऊन बीडच्या दिशेने धुम ठोकली. सदरील कर्मचाऱ्याने आरडाओरडा केली परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले. सदरील पिशवीत ९५ हजार ६१० इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती पोलीसांना देताच गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय प्रफुल्ल साबळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. लवकरच चोरट्यांचे मुसक्या आवळल्या जातील असे विश्वास व्यक्त केला. परंतु भरदिवसा व महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून पोलिस मात्र हप्ते खाण्यात व्यस्त असून दिवसाढवळ्या गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे या वर अंकुश मिळवने पोलिसांना अवघड जात असून वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

■ ADVERTIS


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या