सामाजिक कार्यकर्ते मुक्तार शेख यांना प्राचार्य बी.के.सबनीस स्मृती सद्भावना पुरस्कार प्रदान !


अंबाजोगाई : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मिशन ह्युम्यानीटी फाउंडेशन चे सर्वेसर्वा मुक्तार शेख यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय स्व: प्राचार्य बी.के.सबनीस स्मृती सेवा सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त योगेश्वरी शिक्षण व कर्मचारी पतसंस्था,एन सी सी,जयहिंद ग्रुप आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.बी.शिंदे हे होते तर विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जनसहयोग चे श्याम सरवदे,व इतर अनेक मान्यवर होते.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे होते. पुरस्कार स्विकारल्या नंतर सत्काराला उत्तर देताना/आपले मनोगत व्यक्त करताना शेख मुक्तार म्हणाले की, आपण आजपर्यंत स्व:खुषीने व सामाजिक कार्याच्या आवडीमुळे अनेक बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करत आलेलो आहोत.कोरोना काळात देखील आपण शक्य होईल तेवढी मदत/सहकार्य सर्वसामान्य लोकांना करण्याचा प्रयत्न केला,तसेच बेवारस प्रेतांचे अंत्यविधी करण्यास देखील पुढे सरसावलो.आज मिळालेल्या पुरस्कारामुळे माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पडली असून येणाऱ्या काळात आपणास आणखी सामाजिक कार्य करण्यास उत्साह येईल व बळ मिळेल.या कार्यक्रमात शेख मुक्तार यांच्या बरोबर इतरही मंडळींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस पी कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन बी के मसने यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार थोरात सर यांनी केले/मानले.कार्यक्रमाच्या सांगते नंतर योगेश्वरी शैक्षणिक संकुलाच्या परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !