इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 *हेळंब सेवा सोसायटीवर पंकजाताई मुंडेंच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व*



*जय मल्हार शेतकरी विकास पॅनलचे  सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन*


परळी  । दिनांक २८।

   तालुक्यातील हेळंब सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित  पॅनेलला पराभवाची धुळ चारत भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 


  हेळंब सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी आज निवडणूक झाली.  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - लक्ष्मण आंधळे, रामराव पवार, तुकाराम पाळवदे, यशवंत पाळवदे, प्रभू राठोड, काशीनाथ होळंबे, माधव होळंबे, व्यंकटी होळंबे, नानासाहेब होळंबे, सुरेखा आंधळे, सुनिता होळंबे, राधाकिसन घुले, गोविंद इंचके


 पॅनलच्या विजयासाठी पॅनल प्रमुख माधवराव होळंबे, मोहन होळंबे सरपंच राम पाळवदे उपसरपंच व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या