युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-जी. के. फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 जी. के. फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


- पं. उद्धवबापू आपेगावकर, ज्योतिराम घुले, सुहास सिरसट, कल्याण कुलकर्णी  आदींसह 10 दिग्गजांचा गौरव

.......

- येत्या 30 ऑगस्ट रोजी दिंद्रुड येथे भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा 

......

दिंद्रुड : सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत अग्रेसर असलेल्या जी. के. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्यावतीने येत्या 30 आॅगस्ट रोजी भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा-2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील 10 कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत दिग्गजांना जी. के. फाऊंडेशनतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संयोजक तथा जी. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद केकान यांनी दिली आहे. 


दिंद्रुड येथील स्वराज्य मंगल कार्यालयात 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा रंगणार आहे. क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणारे भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार ज्योतिराम घुले (क्रीडा), जागतिक कीर्तीचे पखवाजवादक पंडित उद्धव(बापू) आपेगावकर (कला आणि संस्कृती), मराठी चित्रपटसृष्टी -बाॅलीवूडमध्ये वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता सुहास सिरसट (अभिनय), फळ बॅक ही अफलातून संकल्पना धुनकवडसारख्या डोंगराळ भागात सत्यात उतरविणारे प्रयोगशील शेतकरी कल्याण कुलकर्णी ( कृषी), बी-बियाणे,खते क्षेत्रात शुन्यातून विश्वनिर्माण करणारे यशस्वी तरूण उद्योजक प्रदीप ठोंबरे (उद्योग),  दबंग लेडी म्हणून नावलौकिक प्राप्त पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे ( प्रशासन), जलसंधारण, पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या सरपंच ललिता व्हरकटे ( ग्रामीण विकास), ग्रामीण वार्तांकनाला प्राधान्य देणारे पत्रकार विष्णू बुरगे ( पत्रकारिता- इलेक्ट्राॅनिक मीडिया), सकारात्मक पत्रकारितेचा मापदंड निर्माण करणारे पत्रकार संजय खाकरे (पत्रकारिता- प्रिंट मीडिया), तृतियपंथियांच्या हक्कांसाठी अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या आयेशा शेख ( समाजकार्य) आदींना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. जी. के. फाऊंडेशच्या पाच सदस्यीय अभ्यासक समितीने या 10 भुमिपूत्रांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

........

दरवर्षी भुमिपूत्रांचा होणार सन्मान : गोविंद केकान 

जी. के. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य ही संस्था ग्रामविकासाला प्राधान्य देत बीड जिल्ह्यात व्यापक काम उभारणार आहे. या वर्षीपासून भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करून आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, ही भावना वाढीस लागावी, हा या मागचा उदात्त हेतू आहे. भुमिपूत्रांचा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जाईल, अशी माहिती सोहळ्याचे संयोजक गोविंद केकान यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या