परळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग_*

 विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना वाव मिळतो -संजय केंद्रे

परळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

परळी (प्रतिनिधी)

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो. नव्या संकल्पनांना चालना मिळते आणि त्यातून मानवाच्या उत्क्रांतीसाठी पोषक असलेल्या गोष्टींचा शोध लागतो असे प्रतिपादन परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले. ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.


पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी हिना अन्सारी, मुख्याध्यापक शास्त्री कांबळे, पत्रकार दत्तात्रय काळे, सय्यद सबअत अली, परीक्षक अशोक पवार, सुनिल चव्हाण यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती.

Click:● *हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू*

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात पुढे बोलत असतांना सांजय केंद्रे म्हणाले की, ज्ञान, विज्ञान, सज्ञान आणि अज्ञान या विद्यार्थ्यांच्या चार बाजू असतात. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या तर्कबुद्धीला वाव मिळतो, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या होतात आणि आपल्याला भविष्यातील शास्त्रज्ञ आपल्याला मिळतात. तर गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनावणे यांनी विज्ञानाच्या विघातक आणि विधायक बाजू उपस्थितांना समजावून सांगितल्या.

Click:● *नात्याला काळीमा: म्हातारचळ लागलेल्या आजोबांकडून नातीवर अत्याचार*

तालुक्यातील सर्व शाळेतील 90 विज्ञान प्रयोग घेऊन विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि त्यावरील उपाय, पर्यावरण आणि हवामान बदल, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता आदि विषयांना घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगाचे सादरीकर केले. याचे परीक्षण आणि मूल्यांकन केले जाऊन विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले जाणार असून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !