भूषण पाठे यांची इंटरनॅशनल ह्यूमन राइट कौन्सिल ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुभाष पाठे यांची इंटरनॅशनल ह्युमन राईट कौन्सिल ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
          औष्णिक विद्युत केंद्र, परळी वैजनाथ येथे कार्यरत असलेले उप व्यवस्थापक (मासं) श्री.भूषण सुभाष पाठे यांची त्यांनी केलेल्या मानवाधिकार कामाचा संदर्भ घेऊन संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेत विशेष स्थान असलेले इंटरनॅशनल ह्यूमन राइट कौन्सिल या गैरसरकारी व गैरव्यवसायिक संस्थेवर वीज व नवकरणी ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी  निवड करण्यात आलेली आहे.
       श्री पाठे हे मूळचे भुसावळ येथील असून ते महाराष्ट्र पक्षी मित्र तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सभासद सुद्धा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ते अविरत कार्य करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !