नात्याला काळीमा: म्हातारचळ लागलेल्या आजोबांकडून नातीवर अत्याचार




दिंद्रुड, प्रतिनिधी....
      नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.म्हातारचळ लागलेल्या एका इसमाच्या दुष्कृत्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८५ वर्षीय आजोबांनी आपल्या अल्पवयीन (१० वर्षे)नातीवर अत्याचार केल्याची घटना  उघडकीस आली आहे.

सर्वजण शेतात गेल्याने अल्पवयीन नात आजोबासोबत घरीच होती. याचा गैरफायदा घेत आजोबाने अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. आई शेतातून घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने सारी हकीकत सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. यावरून आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Click:● *हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू*

नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केला असल्याचे  दिंद्रुड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार