इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 थर्मलजवळील जिलेटिन स्फोट घटना ; सुरक्षा यंत्रणा सदैव सतर्क- थर्मलला काहीही धोका नाही !


नागरिकांनी घाबरून जाऊ नये- मोहन आव्हाड

           
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           मराठवाड्यातील एकमेव असलेले परळीतील औष्णीक वीज निर्मिती केंद्र कायम अतिसंवेदनशील राहिले आहे.या औष्णीक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी व इतर व्यक्तीपासुन धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले त्यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्याकडुन जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे,बॅटरी,वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती...


      परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात काही अज्ञात व्यक्ती राख मोकळी करण्याकरिता स्फोटके आणल्याची खबर मिळताच औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेला याबाबत सतर्क करण्यात आले होते.औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राख तळ्यात राख मोकळी करण्यासाठी जिलेटीन नामक स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचारी यांना आढळून आले.केंद्राच्या सुरक्षा कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करून  3 व्यक्ती ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
          याबाबत वरिष्ठ कार्यालयात माहिती देण्यात आली आहे.सदरील घटनेमुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून या ठिकाणाहून औष्णिक वीज निर्मिती केंद्र 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. जे वृत्त प्रसारित होत आहेत याबाबत वीज केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया घेण्यात आलेली नाही. यामुळे  घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था सुुरक्षा कर्मचारी चोख कर्तव्य बजावत आहे.
     -मोहन आव्हाड
         मुख्य अभियंता
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र
परळी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!