इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 चक्क... पोलीस ठाण्यातूनच पकडलेल्या दोन आरोपींचा गुंगारा 


पेठ बीड ठाण्यातून दोन आरोपींचा गुंगारा !

बीड- गुटखा तस्करी प्रकरणात एसपींच्या विशेष पथकाने पकडलेले दोन आरोपी पेठ बीड पोलीस ठाण्यातून फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रभर आरोपींचा शोध सुरू आहे.


बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.या पथकाने शनिवारी बार्शी नाका भागात एक जीप पकडली.ज्यामध्ये 8 लाखाचा गुटखा सापडला.या प्रकरणात शेख मोहसीन आणि शेख इकबाल या दोघांना अटक केली.


या आरोपींना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्यावेळी आरोपीनी मळमळ होत असल्याचा बहाणा करत पोलीस शिपाई संजयकुमार राठोड यांच्या तावडीतून हे दोघे फरार झाले.या आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रभर पोलीस पथके गस्त घालत होते.


या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या