*शिक्षकाविषयी चुकिची वक्तव्य करणारे आ.प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाकडून जाहीर निषेध*



परळी / प्रतिनिधी


राज्याच्या विधान सभेत शिक्षकांविषयी बेताल व वायफळ गरळ ओकणारे सुज्ञ व सुसंस्कृत आमदार प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी तिव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवला आहे.     


मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात आमदार प्रशांत बंब यांचे  विधिमंडळातील वक्तव्य शिक्षकांना वेठबिगार समजणारे असून शिक्षकांना हिटलरप्रमाणे वागणूक देणारे तसेच शिक्षक वर्गाच्या भावना दुखवणारे व अपमानित करणारे आहे.

     

शासक वर्गाच्या चुकीच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या दुष्परिणामांना शिक्षकांना जबाबदार धरण्याचा आमदार महोदयांचा तो केविलवाणा प्रयत्न होता. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण महाग होत चालले आहे,  सर्वसामान्यांचा आवाक्याच्या बाहेर चालले आहे यावर हे महाशय चकार शब्द बोलत नाहीत.  गावातील नागरिकांनाच रहायला घरे नाहीत तर शिक्षकांना कुठून मिळतील घरे नाहीत म्हणून शिक्षक जीव मुठीत घेऊन अपडाऊन करतात या परिस्थितीकडे आमदार महोदय दूर्लक्ष करतात. शाळेच्या परिसरात शिक्षकांना किमान सुविधा असलेली निवासस्थाने उपलब्ध करून देण्या बाबत बंब आग्रह धरत नाहीत! हजारो शिक्षक वीस बावीस वर्षां पासून विनावेतन काम करत आहेत हे शिक्षक आपला उदरनिर्वाह कसा भागवत असतील, शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना आणि शिक्षकांना कितीतरी शाळाबाह्य कामे लावताना त्याचे शिक्षणावर काय परिणाम होत आहेत याची माहिती घेऊन त्याचा जाब या महाशयांनी सरकारला विचारला असता तर शिक्षणा बद्दल यांना काही कणव आहे असे वाटले असते. कोठारी आयोगाने सूचवल्या प्रमाणे सर्वांसाठी एकच शाळा या सूचनेची अंमलबजावणी का झाली नाही! स्वयं अर्थसहाय्यित शाळा,  कॉन्व्हेंट स्कूल, इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यासाठी परवानगी देऊन विषमतापूर्ण शिक्षणास कुणी चालना दिली आणि यास आळा घालून सर्वांना समान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी काय करता येईल याचाही विचार बंबसाहेबांनी करावे! विधानसभेत आमदार महोदय बोलले त्यांना लिहिने वाचणे शिक्षकांनीच शिकवले याचा विसर आमदार साहेबांना पडला.  शिक्षक चोर आहेत , खोटे बोलतात असे बेलगाम आरोप करणा-या प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक मस्कले,बंडू अघाव, जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे, सचिव गणेश आजबे,नागनाथ तोंडारे, नामदेव काळे,परवेज देशमुख,विजय गणगे,सुभाष शेवाळे,गुलाब शेख, गोवर्धन सानप, हनुमंत घाडगे, व्यंकटराव धायगुडे, मनोज सातपुते, डी.एम.तावरे, युवराज मुरुमकर, विनोद सवासे, आय.जे.शेख,अनुप कुसुमकर, श्रीहरी दहिफळे, श्रीधर गुट्टे, संजय गोरे, अलिशान काजी,ज्ञानोबा गडदे,बालासाहेब जाधव, बी.टी.अघाव, राजाभाऊ नागरगोजे, राजाभाऊ राठोड,डी.एल.कांदे,एकनाथ लांडगे, रामलिंग गडदे, लक्ष्मण राऊत, गोपीनाथ सोनवणे,जी.एम. एरकलवाड,आर.जी.निला,पी.टी.पुंडकरे, बापुराव खोतपाटील, दिपक अघाव, अनंत मुंडे,उध्दव गोरे, संजय फड, संभाजी फुलारी, खान जब्बार अजीज,एम.डी.डोळे,दिपक सोळंके, अश्विन गोरे, अशोक गाडेकर, शिवाजी ढोबळे, जीवन थोरात, बाळासाहेब टिंगरे,दादासाहेब घुमरे, सुंमत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदिप चव्हाण, हेमंत धानोरकर, सुनील दराडे, नदीम युसुफ, पुरुषोत्तम येडे पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार