नागेश संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे सत्यान्वेषी व निर्दोषरित्या संशोधन होणे आवश्यक - ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे



सोलापूर (प्रतिनिधी) नागेश संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा सांगोपांग ,साक्षित्वाने आणि निर्दोष संशोधन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन एकदिवसीय "राष्ट्रीय चर्चासत्राचे" समारोपप्रसंगी, संत वाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.

       श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी श्रीक्षेत्र वडवाळ व देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय "राष्ट्रीय चर्चासत्र" श्री नागेश संप्रदायाच्या साहित्यातील तत्वज्ञानाचा अभ्यास या विषयावर आयोजित  करण्यात आले होते.

या चर्चासत्राचे उद्घाटन न्यायाधीश श्रीमती सुनिता कंकणवाडी धर्मादाय उपायुक्त सोलापूर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून झाले तर बीजभाषण प्राचार्य इ.जा तांबोळी यांचे झाले.या कार्यालयात डॉ.सुरैय्यापरवीन जहागीर जहागीरदार यांनी लिहिलेल्या ,"मध्ययुगीन संत: अज्ञानसिध्द व शहा मुंतोजी बामणी "याचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीगणेश देशपांडे,श्रीदेवीदास गुरव , श्रीरामचंद्र धर्मशाले, डॉ.सुरैय्यापरवीन जहागिरदार आदिंची भाषणे झाली.

        व्यासपीठावर श्रीपोपटबुवा शिवपुजे,श्रीआकाशबुवा शिवपुजे,श्रीखर्गे महाराज देगाव, श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी श्रीक्षेत्र वडवाळचे विश्वस्त  श्रीकांतराव  शिवपुजे , ॲड.दत्तात्रय शेटे,देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय , मोहोळचे प्रा.नंदकिशोर देशपांडे (संयोजक), प्राचार्य डॉ.दत्तात्रय तिकटे, डॉ.विक्रम पवार,प्रतापसिंह गरड (सचिव)तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन महेश कोठीवाले यांनी केले.या कार्यक्रमास प्रचंड संख्येने नागेश भक्तांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !