युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 गणेशोत्सवापूर्वी  शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा-प्रा.अतुल दुबे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  

गौरी -गणपती उत्सवाचे दिवस जवळ आलेले असून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी परळी वैजनाथ न.प.प्रशासनाने शहरातील मुख्यरस्त्या सोबतच छोट्या गल्लीतील खुड्डे बुजवावेत व विविध ठिकाणी ढाप्याची ही दुरवस्था झाली आहे. तेही दुरुस्त करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


 परळी शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे झाले आहेत तसे ढाप्याच्याही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अगदी काही दिवसांवरच गौरी-गणपती उत्सव आला असून परळी वैजनाथ शहरातील मुख्य रस्त्या सह छोट्या गल्लीमध्ये मोठ मोठे खड्डे

असून यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना मोठा त्रास होत असुन रोजी छोट्या-मोट्या स्वरूपाचे अपघात होत आहेत.

शहरातील प्रत्येक भागात गणरायच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या भव्य मिरवणूक काढण्यात येतात अश्या वेळी या खड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येते नाही व यामुळे शहरात कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर असलेले सर्व खड्डे बुजवण्याचे काम परळी वैजनाथ नगरपरिषदेने हाती घ्यावे अन्याना तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी  दिला आहे.


■ ADVERTIS


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या