*सरकारमध्ये कामगार प्रतिनिधी नसल्यानेच कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत- काॅ. डी एल कराड* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

        राज्य व केंद्र सरकारमध्ये कामगारांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत नसल्यामुळेच वर्षानुवर्ष कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात. याचा विचार करून कामगार एकजुटीने सरकारला नमवले पाहिजे असे प्रतिपादन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काॅ. डी एल कराड यांनी केले.

         परळी वैजनाथ येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा सिटूचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड उपस्थित होते. या अधिवेशनाला सिटू संघटनेचे राज्य सरचिटणीस काॅ.एम.एम. शेख, राज्य कोषाध्यक्ष के आर रघु उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी संघटनेच्या मागील तीन वर्षाचा कार्य अहवाल सादर केला व अधिवेशनात तो मंजूर करण्यात आला.काॅ.  एम एम शेख यांनी यावेळी राज्यातील व देशातील कामगारांच्या प्रश्नाबद्दल मार्गदर्शन करून संघटनेत एकजुटीने सक्रिय होऊन लढा दिल्यास हमखास यश येते त्यामुळे सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन केले.

     यावळी डी वाय एफ आय चे जिल्हा अध्यक्ष विशाल देशमुख, शेतमजूर युनियन चे जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर नागरगोजे यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

   यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये काॅ. बी जी खाडे यांची अध्यक्षपदी व अशोक थोरात यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. कॉ. शिवाजी कुरे व काॅ. दत्ता डाके यांची उपाध्यक्षपदी व किरण सावजी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. कॉ के आर रघु यांनी नवीन कार्यकारणीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा बीजी खाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर शिवाजी कुरे यांनी आभार प्रदर्शन केले. या अधिवेशनास बीड जिल्ह्यातील 80 प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शेख जावेद, जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले, उर्मिला लांबोटे, साईराम कांबळे, यासीन शेख, साबिर शेख ,शेख जावेद, प्रकाश वाघमारे मंगेश सरवदे ,बाबा रोडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार