परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 *गाढे पिंपळगाव येथे बैलपोळा उत्साहात साजरा*



परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)                                                              

       तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बैलपोळा परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती मुळे बैलपोळा साजरा करता आला नाही. यंदा हरहर महादेवच्या घोषणेत बैलांच्या भव्य मिरवणूका काढण्यात आल्या. 

          गाढे पिंपळगाव येथे बैलपोळा शेतकऱ्यांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गेले दोन वर्षे पोळा सण शेतकऱ्यांना कोरोनामुळे साजरा करता आला नाही. गाढे पिंपळगाव येथे प्रत्येक सणांचे मान गावपातळीवर परंपरेने ठरवण्यात आले आहेत, होळीचा मान शरदराव राडकर, दसऱ्याचा मान मार्तंडराव वाघमोडे, यांच्याकडे आहेत ही परंपरा गेले अनेक वर्षांपासून चालू आहे त्यानुसार बैलपोळ्याचा मान जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे यांच्या कडे परंपरागत आहे. गावात सुरुवातीला वाघमोडे यांच्या बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. मारुती व महादेव मंदीराला पाच फेरी घालून गावात वेशीवर जे तोरण आहे हे त्यांच्या कडून तोडले जाते व संपूर्ण गावात ही मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर गावातील इतर सर्व शेतकऱ्यांच्या बैलांच्या मिरवणूका हरहर महादेवच्या घोषणा देत वाजत गाजत काढण्यात येतात. या वर्षी ही परंपरागत पध्दतीने पोळा साजरा करण्यात आला. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पाऊस चांगला झाल्याने सुगी चांगली आली आहे. दोन वर्षानंतर पुन्हा परंपरेने हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये उत्साह दिसून येत होता.

■ ADVERTIS


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!