नीट परिक्षेचा निकाल 7 तारखेला !




नवी दिल्ली- मेडिकल एन्टरन्स परीक्षेच्या अर्थात नीट ची निकालाची तारीख जाहीर झाली आहे.7 सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असून त्यापूर्वी omr शिट्स आणि उत्तरपत्रिका मिळेल.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तयारीत रहा अन अपडेट मिळवण्यासाठी News&Views शी कनेक्टेड रहा.


नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.


राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.


याचे निकाल 30 ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती.


या परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात. तिथे तुमचा सीट नंबर आणि दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल


त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या ईमेल आयडीवर उत्तर की, OMR शीट्स रिलीझ करण्याबाबत अपडेट मिळेल. एकदा जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ती संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल ७ सप्टेंबरपर्यंत येईल अशी माहिती मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला