पोस्ट्स

MB NEWS:बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे

इमेज
 ● परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होणार बाल संस्कार केंद्र: आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           आजकाल मोबाईल, कार्टून, गेम्स, व्हीडीओ या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना गोष्टींतून संस्कार देणे अनेकदा कठीण होते. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टीतून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजविली जात असे. आता ही सहज बाबही मागे सरत आहे. हाच हेतू समोर  ठेवून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे.आ.धनंजय मुंडे यांच्याहस्ते माहितीपत्रकाचे विमोचन  करण्यात आले.संस्कार केंद्र ही काळाची गरज असुन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.       पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन  करण्यात आले.यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजू, प्रा.बाबासाहेब देशमुख, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, आयोजक बाजीरा

MB NEWS:प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने सन्मानित

इमेज
  प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे  "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने सन्मानित  जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था(धानोरा) ,अंबाजोगाई आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात दि.११मार्च २०२३ रोजी संमेलनाध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील,उदघाटक हभप प्रकाश महाराज बोधले,माजी मंत्री मा.पंडितराव दौंड,वसंतराव मोरे, राजेसाहेब देशमुख ,उद्धव बापू आपेगवकर,संकेत मुनोत,विद्याधर पांडे, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब,चंद्रकांत हजारे, विश्वांभर वराट,ॲड.अनंतराव जगतकर, आयोजक मनीषा पांडे, संभाजीराव सुळ, अनिरुद्ध येचाळे, बसवंत उबाळे, बा. सो. कांबळे,प्रा. संतराम कराड आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार त्यांनी आपले आद्यनाटय गुरू स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या स्मृतीस अर्पण केला आहे. कवी-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक आणि संशोधक म्हणून प्रा.डॉ. सिध्दार्थ तायडे सर्वपरिचित आहेत. प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा कला क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी आहे.त्यांनी अनेक नाट्यकृतींचे दमदार सादरीकरण केले आहे. त्यांच्या लघुपटांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर

MB NEWS:पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी कौठळीच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला ! पद्मावती नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ  मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी परळी वैजनाथ ।दिनांक १२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडून मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने वेगवेगळ्या   रस्त्यासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. कौठळी येथील पद्मावती नदीवरील पुल बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी आणून त्यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. सरपंच व ग्रामस्थांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.      पंकजाताई मुंडे नेहमीच परळी मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असतात. पालकमंत्री असताना त्यांनी कधी मिळाला नाही एवढा कोटयवधीचा निधी आणून विकास कामं केली  आणि आता  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत, शिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्यांनी विविध गावच्या रस्त्यासाठी सुमारे ३२ कोटीचा निधी

MB NEWS:सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक

इमेज
  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक प्रयागबाई बळीराम शेळके यांचे  निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.  याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रयागबाई शेळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे रविवारी दुपारी 5 वाजता करण्यात येणार आहेत.

MB NEWS:बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ

इमेज
  संगणक शिक्षणासाठी कामगार पाल्यांना २ लाखाचे अर्थसहाय्य मंजूर  बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्स करणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार व कामगार पाल्यांनी एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्से उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना कामगार कल्याण मंडळातर्फे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, एम.एस.सी-आयटी हा कोर्स पूर्ण करून व्यवसाय करता यावा तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी या योजनेंतर्गत अर्थसहाय्य करून प्रोत्साहन दिले जाते. यंदाच्या वर्षात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार पाल्यांना २ लाख २ हजार ९५० रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेली रक्कम लाभार्थींच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ---‐------‐---------------------------------------- कामगारांची मुले संगणक शिक्षणात पुढे यावी. संगणक शिक्षणातून आर्थिक सक्षम व्हावी म

MB NEWS:यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर

इमेज
  यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर  परळी प्रतिनिधी ---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक व इतिहास विभाग प्रमुख  डॉ.  बाबासाहेब शेप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केद्र प्रमुख डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार प्रेरणादायी होते ते आजच्या युगात आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या सुधारणा करून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या कार्यामुळेच मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हा

MB NEWS:सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

इमेज
  अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचा मृत्यू सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिवसेंदिवस परळी शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्याने सुसाट आणि अनियंत्रित मोटारसायकली पळवण्याचे सर्रास प्रकार होत असून, याचा फटका एका पोलीस कर्मचाऱ्यालाच रविवारी बसला. अतिप्रचंड वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या वयोवृद्ध आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सदरील घटना घडली. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.  याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले हो

MB NEWS:नावनोंदणी करण्याचे आवाहन

इमेज
  २५ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा नावनोंदणी करण्याचे आवाहन  परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१२ - समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.त्या बरोबरच साधू-संतांची उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते.            हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार, प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते. यंदाच्या वर्षी २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या उपनयन संस्कारासाठी इच्छुकांनी बाळू महाराज जोशी उखळीकर मो- ९८२३४३०७०७,विशाल जहागीरदार (गोविंदा ट्रेडर्

MB NEWS:आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार

इमेज
  सिरसाळ्याच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेत कॅशियरने केला 19 लाखांचा अपहार आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार सिरसाळा : येथील अंबेजोगाई पीपल्स बँक शाखेत कॅशयीर पदावर असणारे सुनील अशोक देशमुख यांनी १९ लांखाचा अपहार केल्याची तक्रार शाखा व्यवस्थापकांनी सिरसाळा पोलीसात दिली आहे.        दिनांक ९ मार्च रोजी कॅशियर सुनिल देशमुख सायंकाळ पासुन सिरसाळा येथून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांचे बंधु प्रशांत अशोक देशमुख यांनी दिनांक १० मार्च रोजी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे येवून दिली. तक्रारीत प्रशांत देशमुख म्हणाले कि, माझा भाऊ सुनील देशमुख यांने मोबाईल वर मेसेज केला की बँकेतील कर्मचारी पैशांचा घोटाळा करत आहेत व तो सर्व घोटाळा माझ्या अंगलट येणार असल्याने मी आत्महत्या करत आहे. दरम्यान कॅशियर देशमुख बेपत्ता झाल्याचे समजल्याने बँक मॅनेजर यांनी बँकेत रक्कम तपासली असता १९ लाख रुपये तिजोरीतून गायब असल्याचे निदर्शनास आले.  मॅनेजर इंगळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे कॅशयर सुनील देशमुख यांच्या विरोधात अपहार प्रकरणी तक्रार दिली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत

MB NEWS:धुळे जिल्हा न्यायालयातील अजब प्रकार

इमेज
  वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा; फोटो काढून मौलानाला पाठवला धुळे जिल्हा न्यायालयातील अजब प्रकार  धुळे :धुळे जिल्हा व सत्र,, न्यायालयात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोर्टात वकील काम करतेवेळी वकिलाचं तोंड बंद करण्यासाठी एका इसमाने चक्क जादूटोणा केला असल्याचे कळताच वकील वर्गात एकच खळबळ उडाली.          धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात आज रोजी घडला आहे.धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाचे फोटो काढून नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअपद्वारे पाठवून वकिलाने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलती बंद व्हावी, यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.              धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे जेष्ठ विधीज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील ॲड.शामकांत रावजी पाटील यांच्या फिर्यादीवरून निसार शेख अमीर खाटीक याच्या विरोधात नरबळी आणि इतर अघोरी प्रथा व जाद

MB NEWS:बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

इमेज
अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी चार आरोपी जेरबंद ! बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी माजलगाव, दि.१०: येथील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींना अखेर बीड स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या चार आरोपीना पुढील तपास करीत माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, दि.07 मार्च 2023 रोजी फिर्यादी श्री. अशोक तुळसिराम शेजुळ धंदा – व्यापार रा. गजानन नगर माजलगाव हे त्यांचे स्कुटीवर घराकडे जात असतांना त्यांचे पाठीमागुन कोणीतरी दोन किंवा तीन मोटारसायकल वरुन पाच ते सहा अनोळखी इसम हे तोंडाला रुमालाने झाकलेले असस्थेत असलेले अंदाजे 20 ते 30 वयोगटातील यांनी ओव्हरटेक करून लोखंडी पाईपने दोन्ही पाय व हातावर, गालावर फिर्यादीस मारहाण करून गंभीर जखमी केले व मोटार सायकलवर पसार झाले. वगैरे फिर्याद वरुन पो.ठा. माजलगाव शहर गुरनं 83/2023 कलम 147, 148, 149, 307, 120 (ब) भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठ

MB NEWS:दोन कोटींच्या विकास कामांचा थाटात शुभारंभ

इमेज
अर्ध्या रात्रीपर्यंत जागून चारदरीकरांनी  केले खा. प्रीतमताई यांचे जंगी स्वागत दोन कोटींच्या विकास कामांचा थाटात शुभारंभ किल्ले धारूर, प्रतिनिधी :- तालुक्यातील चारदरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व ईतर विविध विकास कामांचे भूमीपुजन बीडच्या लोकप्रीय खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजित कार्यक्रम आणि ठिकठिकाणी होणारे स्वागत यामुळे खा. प्रीतमताई यांना चारदरी  येथे येण्यास रात्र झाली. परंतू विकासाची गंगा घेऊन येणार्‍या लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी अबाल- वृध्दांसह सारे गाव अर्ध्या रात्रीपर्यंत जागे होते. सरपंच दत्ताभाऊ मुंडे यांच्या नियोजनात गावकर्‍यांची फुलांच्या उधळण करत भव्य अशी मिरवणुक काढल्यानंतर रात्री उशीरा विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले. स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना त्यांची लोकप्रीयता आणि जागोजाग होणार्‍या स्वागतामुळे कार्यक्रमाला नियोजित वेळेत कधीच जाता आले नाही. लोकनेते मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकींना देखील लोकांचे प्रेम मिळत आहे. यामुळे त्यांना देखील कोणत्याही कार्यक्रमाला नियोजित वेळेत पोचता येत नाही. याची प्रचिती धारूर ताल

MB NEWS:जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीकडून कु.सान्विला वैद्यकीय मदत

इमेज
  जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीकडून कु.सान्विला वैद्यकीय मदत सान्वीच्या उपचारासाठी सर्वतोपरी वैद्यकीय मदत करणार –सुषमा अंधारे परळी (प्रतिनिधी) जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने थायलोसेमिया या अत्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हीला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. थायलोसेमिया या आजाराने ग्रस्त असतांना त्यावरील उपचारासाठी तीला जवळपास ३० लाखांचा खर्च येतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तीच्या उपचारासाठी परळी शहरातून मदत गोळा करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक भावनेला जोपासत या मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पक्षाच्या वतीने सान्वीच्या सर्व वैद्यकीय उपचाराची आर्थिक जबाबदारी घेतली. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार, दि.१० मार्च रोजी शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव समितीकडून अनावश्यक खर्चाला फाटा देत अत्यंत साधेपणाने जयंती साजरी के

MB NEWS:महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विध्यार्थिनींची नगर परिषद कार्यालयास भेट

इमेज
महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विध्यार्थिनींची नगर परिषद कार्यालयास भेट कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ येथील राज्यशास्त्र विभागातील  राज्यशास्त्र विषयाच्या  विद्यार्थिनींना अभ्यासाशी निगडीत माहिती देण्यासाठी प्रा. डॉ. आर.पी.शहाणे. राज्यशास्त्र विभाग प्रमुख. व प्रा.राठोड एस.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत  नगर परिषद् कार्यालय परळी वैजनाथ येथे भेट देण्यात आली.  या भेटीत नगर परिषद कार्यालय अधिक्षक श्री. संतोष रोडे साहेब यांनी आम्हाला सहकार्य केले आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना न. प.च्या कामकाजाची माहिती देण्यास सांगीतले. सर्व विध्यार्थीनींनी  नगर परिषदेतील सर्व विभाग जसे रोखपाल विभाग, वसुली विभाग, अग्निशमन विभाग, जन्म-मृत्यू नोंद विभाग, नियुक्ती विभाग, व्यवस्थापन विभाग या सर्व विभागाला भेटी दिल्या व त्या त्या विभागाची सर्व माहिती मीळवीली .विभागाचे प्रमुख श्री. शेख जमील सर, श्री. सुरेश डहाळे सर ,श्री. सुनील आदोडे सर, श्री. सतीश खेबाळे सर ,श्री. दत्तात्रय देशमुख सर , आशा रोडे मॅडम या सर्वांनी आम्हास व्यवस्थी

MB NEWS:महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल लिंगायत समाजतर्फे परळीत आनंदोत्सव.

इमेज
  महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल लिंगायत समाजतर्फे परळीत आनंदोत्सव परळी वैजनाथ महाराष्ट्र सरकारने जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतल्याबद्दल परळी वैजनाथ लिंगायत समाजातर्फे महाराष्ट्र शासनाचे आभार मानत निर्णयाचे स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित, बेरोजगार व नव- उद्योजकांना अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. यामुळे युवकांना व्यवसाय उभा करण्यासाठी सरकार महामंडळा मार्फत पतपुरवठा करणार आहे. आर्थिक अडचणी असल्यामुळे लिंगायत समाजातील अनेक युवक व्यवसाय उभा करू शकत नव्हते. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून यामुळे समाजाच्या उन्नतीचे दार उघडले जाणार असल्याचे यावेळी अश्विन मोगरकर यांनी सांगितले. यापूर्वी या महमंडळाच्या स्थापनेची मागणी अनेकांनी तत्कालीन शासनकर्त्याकडे केली होती. मात्र या सरकारने जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करत सर

MB NEWS:लावणयाई पब्लिक स्कूल च्या वतीने "जागतिक महिला" दिन साजरा

इमेज
  लावणयाई पब्लिक स्कूल च्या वतीने "जागतिक महिला" दिन साजरा  डाॅ. श्रद्धा देशपांडे यांच्या हस्ते शिक्षिकांचा गौरव  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त आज परळी येथील  लावणयाई पब्लिक स्कूल येथे उत्साहात  साजरा करण्यात आला या वेळी  डाॅ श्रद्धा  गुरूप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते  शाळेतील महिला  शिक्षकांना  सत्कार करण्यात आला                       या कार्यक्रमाला  शाळे चे  अध्यक्ष  अनंत कुलकर्णी   मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  डाॅ  अनूजा पंकज  देशमुख  आदि मान्यवर  उपस्थित  होते  दरम्यान    डाॅ श्रद्धा  गुरूप्रसाद  देशपांडे यांनी  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पुजा बिडवे यांनी केले    या महिला दिनानिमित्त  शाळेतील  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  उपमुख्याध्यापक  पुजा बिडवे सहशिक्षिका  कविता विधै हर्षदा  परदेशी  संघमिञा पोटभरे  सफाई  कामगार कोंडाबाई धुमाळ यांच्या  विशेष सन्मान  करण्यात  आला या कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन  हर्षदा परदेशी यांनी केले

MB NEWS::जि प प्रा शा संगम शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

इमेज
  जि प प्रा शा संगम शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप परळी:  श्री नागनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा संगम येथे सचिन (मोनु भैय्या) नागरगोजे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना  मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यात  रजिस्टर,पेन,पेन्सिल, खोडरबर,शार्पनर इ साहित्य वाटप कटण्यात आले, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  नवनाथ नागरगोजे,लक्की  नागरगोजे , रामदास देवळकर,सोमेश्वर दराडे रतन दराडे, परमेश्वर दराडे, कैलास उमाप उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे सर,सहशिक्षक सर्वश्री श्री महादेव गित्ते सर,सचिन फड सर,श्रीम.बबिता शिंदे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले

MB NEWS:परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन

इमेज
  परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन  परळी वैजनाथ परळी शहरात व उड्डाणपूलावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी शहरातून होणारी जड वहातुक बंद करून बायपास मार्गे वळवणे बाबत परळी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. परळी शहरात उड्डाणपूल मार्गे राख, वाळू व इतर साहित्य वाहून मोठमोठी वहाने बिनदिक्कत प्रवास करीत आहेत. ही वहाने वेगात चालवली जात असल्यामुळे कायम अपघात होत असतात. कालच उड्डाणपूलावर घडलेल्या एका मोठ्या अपघातात परळीतील भीमनगर येथील आशिष ताटे व राजेश पोटभरे हे दोन युवक ठार झाले. असे अपघात वारंवार शहरात घडत आहेत. यापूर्वीही अनेक अपघात उड्डाणपुलावर घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला किंवा अपंगत्व आले आहे. परळी शहरातून उड्डाणपुलमार्गे प्रवास करणाऱ्या भेल स्कुल, न्यू हायस्कूल शाळा, विद्यावर्धिनी शाळेतील अनेक विदयार्थ्यांच्या तसेच थर्मल पॉवर स्टेशन व इतर कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या जीवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.  परळी बायपास रोड पूर्ण झाला असून जड वाहनांच्या वाहतूकीस शहरातून पूर्णपणे बंदी घालून बायपास मार्गे वळव

MB NEWS:धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर

इमेज
  वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या कॉरिडॉरसह विविध विषयी बैठक घेऊन निर्णय घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई (दि. 10) - केंदीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद (PRASHD)' योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी आ.धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार पर्यटन संचालनलयामार्फत श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ जिल्हा बीड या ज्योतिर्लिंग स्थळ विकासाचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; असे उत्तर पर्यटन मंत्रालयाने आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर दिले आहे. परळी येथील श्री वैद्यनाथ हे शंकराचा 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 वे ज्योतिर्लिंग असून इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंढरपूरच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास 500 कोटी रुपये निधी द्यावा, तसेच वैद्यनाथांसह राज्यातील सर

MB NEWS:शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

इमेज
  शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज परळी / प्रतिनिधी हक्क व न्याय मागणाऱ्यांना इथल्या व्यवस्थेने नेहमीच कोरडे ओढले असल्याचा इतिहास अनादी काळापासून आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटितपणे व विचारपूर्वक आंदोलन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.परळी व धारूर तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने कान्नापूर येथील शेतकरी कीर्तन महोत्सवात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. परळी आणि धारूर तालुक्यातील कान्नापूर व आसपासच्या १४ गावांनी मिळून जगद्गुरू संत तुकाराम बीजाचे औचित्य साधत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन कान्नापूर येथे केले होते.गुरुवार दि 9 रोजी संपन्न झालेल्या काल्याच्या कीर्तनात श्यामसुंदर महाराज म्हणाले, नैतिकता सदविचार, आचार, आत्मविश्वास, भूतदया, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श वस्तुपाठ सर्वच संतांनी आपल्या आचरणातून घालून दिलेला आहे. शेतकऱ्यांना नेते नाहीत म्हणून अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या घामाने व कष्टाने तयार केलेल्या उत्पन्नावर फक्त शेतकऱ्यांचा अधिकार आहे

MB NEWS:बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची नायालयीन कोठडीत रवानगी

इमेज
  बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची नायालयीन कोठडीत रवानगी अंबाजोगाई - तालुक्यातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय वृद्धास पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि.०९) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २१ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.  अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेस चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दाखवून विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) अने तिच्यावर अत्याचार केला होता. पिडीत मुलीचे पोट दुखू लागल्याने या कुकर्माला वाचा फुटली होती. पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  विष्णू सादुळे याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काचा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला तत्काळ बेड्या ठोकून पोलिसांनी सोमवारी (दि.०६) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २१ मार्चपर्यंत आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, या अत्याचार प्रकरणाचे अंबाजोगाईत संतप्त पडसाद उमटले होते. शालेय

MB NEWS:गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात

इमेज
  गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात  गेवराई.... दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.     सादिक सिद्दीकी असे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत असून २३ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रारदाराच्या मामावर पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी ३ लाख रुपयाच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. लाच मागणे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस हवालदार भीमराज जीवडे, पो.ना पाठक, चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल यांनी केली.

MB NEWS:ही तर 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली विकासाची नक्कल

इमेज
  राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकाभिमुख घोषणांचा पाऊस- धनंजय मुंडे कांदा-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना नसणे दुर्दैवी - मुंडेंची प्रतिक्रिया स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा सरकारला विसर पडावा, हे अत्यंत दुर्दैवी - धनंजय मुंडे मुंबई (दि. 09) - आज जाहीर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आहे! मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कांदा-कापूस, हरभरा, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असताना, शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या घडत असताना त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही, याबद्दल धनंजय मुंडे यांनी चिंता व्यक्त केली.  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीन

MB NEWS:नागालँडमध्ये विरोधीपक्षच नाही : भाजप-राष्ट्रवादी साथ साथ ;राष्ट्रवादी आणि जेडीयूने विनाअट पाठिंबा

इमेज
  नागालँडमध्ये विरोधीपक्षच  नाही : भाजप-राष्ट्रवादी साथ साथ ; राष्ट्रवादी आणि जेडीयू चा विनाअट पाठिंबा राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  कधी कोणती खेळी करतील हे ही सांगता येत नाही. आता नागालँडचंच (Nagaland) उदाहरण घ्या. नागालँडमधील एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा आश्चर्यजनक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय. सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप आघाडी (NDPP-BJP Alliance) सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये सात आमदार आहेत. या सर्व आमदारांचा एनडीपीपीप्रणित रियो यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आग्रह होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं या आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. हे सरकार रियो (Neiphiu Guolhoulie Rio) यांच्या नेतृत्वात एनडीपीपीचं आहे. त्यामुळे पाठिंबा दिला असल्याची भूमिका राष्ट्रावादीनं घेत भाजपपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलाय.  नागाल

MB NEWS:प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांना "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार" जाहीर

इमेज
  प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांना "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार" जाहीर अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात"राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने" प्रख्यात रंगकर्मी प्रा.डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे यांना सन्मानित करण्यात येणार  आहे. जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात  दि.११ व १२ मार्च २०२३ रोजी संमेलनाध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील,उद्घाटक ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, मा.खा. रजनीताई पाटील,मा. खा.इम्रान प्रतापगडी,आ.नानाभाऊ पटोले,प्रमुख अतिथी मा.पंडितराव दौंड,आ. नमिता मुंदडा, वसंतराव मोरे, गोविंदराव देशमुख ,चंदूलाल बियाणी, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विद्याधर पांडे, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब आणि संयोजन समितीने  जाहीर केले आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. कवी-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक आणि संशोधक म्हणून प्रा. सिध्दार्थ तायडे सर्वपरिचित आहेत.