प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विध्यार्थिनींची नगर परिषद कार्यालयास भेट

महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विध्यार्थिनींची नगर परिषद कार्यालयास भेट




कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ येथील राज्यशास्त्र विभागातील  राज्यशास्त्र विषयाच्या  विद्यार्थिनींना अभ्यासाशी निगडीत माहिती देण्यासाठी प्रा. डॉ. आर.पी.शहाणे.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख. व प्रा.राठोड एस.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत  नगर परिषद् कार्यालय परळी वैजनाथ येथे भेट देण्यात आली.


 या भेटीत नगर परिषद कार्यालय अधिक्षक श्री. संतोष रोडे साहेब यांनी आम्हाला सहकार्य केले आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना न. प.च्या कामकाजाची माहिती देण्यास सांगीतले. सर्व विध्यार्थीनींनी  नगर परिषदेतील सर्व विभाग जसे रोखपाल विभाग, वसुली विभाग, अग्निशमन विभाग, जन्म-मृत्यू नोंद विभाग, नियुक्ती विभाग, व्यवस्थापन विभाग या सर्व विभागाला भेटी दिल्या व त्या त्या विभागाची सर्व माहिती मीळवीली .विभागाचे प्रमुख श्री. शेख जमील सर, श्री. सुरेश डहाळे सर ,श्री. सुनील आदोडे सर, श्री. सतीश खेबाळे सर ,श्री. दत्तात्रय देशमुख सर , आशा रोडे मॅडम या सर्वांनी आम्हास व्यवस्थीत माहीती सांगीतली या वेळी सर्व न.प. कार्यालयातील सर्व कर्मचऱ्यांचे सहकार्य मिळाले त्यावेळी  राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी, राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शहाणे आर. पी. प्रा. रोठोड एस. पी. व दुधाट आशालता हे सर्व उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या