MB NEWS:धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर

 वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकासासाठी केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश



धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीवर पर्यटन विभागाचे लेखी उत्तर


वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या कॉरिडॉरसह विविध विषयी बैठक घेऊन निर्णय घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


मुंबई (दि. 10) - केंदीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद (PRASHD)' योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी आ.धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार पर्यटन संचालनलयामार्फत श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ जिल्हा बीड या ज्योतिर्लिंग स्थळ विकासाचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; असे उत्तर पर्यटन मंत्रालयाने आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर दिले आहे.


परळी येथील श्री वैद्यनाथ हे शंकराचा 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 वे ज्योतिर्लिंग असून इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंढरपूरच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास 500 कोटी रुपये निधी द्यावा, तसेच वैद्यनाथांसह राज्यातील सर्व पाचही ज्योतिर्लिंग स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्रिय पर्यटन विभागाच्या प्रसाद या योजनेत समावेश करावा, अशी मागणी लक्षवेधी सुचनेद्वारे धनंजय मुंडे यांनी केली होती.


वैद्यनाथ मंदिर येथे अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी 10 कोटी रुपये, तसेच वन विभागाच्या उपलब्ध जागेत वन उद्यान विकसित करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात 6 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.


विधानसभेत आ. धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीवर देण्यात आलेल्या लेखी उत्तरात वैद्यनाथ तिर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन विभागाच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 


त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी ज्योतिर्लिंग स्थळांच्या विकासाची उपस्थित केलेली लक्षवेधी अत्यंत महत्वाची असून, याद्वारे करण्यात आलेल्या सर्वच मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी बोलताना म्हटले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !