MB NEWS:परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन

 परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन 




परळी वैजनाथ

परळी शहरात व उड्डाणपूलावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी शहरातून होणारी जड वहातुक बंद करून बायपास मार्गे वळवणे बाबत परळी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

परळी शहरात उड्डाणपूल मार्गे राख, वाळू व इतर साहित्य वाहून मोठमोठी वहाने बिनदिक्कत प्रवास करीत आहेत. ही वहाने वेगात चालवली जात असल्यामुळे कायम अपघात होत असतात. कालच उड्डाणपूलावर घडलेल्या एका मोठ्या अपघातात परळीतील भीमनगर येथील आशिष ताटे व राजेश पोटभरे हे दोन युवक ठार झाले. असे अपघात वारंवार शहरात घडत आहेत. यापूर्वीही अनेक अपघात उड्डाणपुलावर घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला किंवा अपंगत्व आले आहे. परळी शहरातून उड्डाणपुलमार्गे प्रवास करणाऱ्या भेल स्कुल, न्यू हायस्कूल शाळा, विद्यावर्धिनी शाळेतील अनेक विदयार्थ्यांच्या तसेच थर्मल पॉवर स्टेशन व इतर कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या जीवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

परळी बायपास रोड पूर्ण झाला असून जड वाहनांच्या वाहतूकीस शहरातून पूर्णपणे बंदी घालून बायपास मार्गे वळवली तर अपघात बंद होतील असे अश्विन मोगरकर यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

जड वाहनांवर शहरातून होणारी वाहतूक त्वरित बंद करावी या मागणीचे निवेदन परळी भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवार दि 8 मार्च रोजी संभाजीनगर पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष महादेव ईटके, रमेश गायकवाड, अश्विन मोगरकर, अच्युत जोगदंड, दीपक जगतकर, सुशील हरंगुळे, उमेश निळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !