परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल लिंगायत समाजतर्फे परळीत आनंदोत्सव.

 महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल लिंगायत समाजतर्फे परळीत आनंदोत्सव



परळी वैजनाथ

महाराष्ट्र सरकारने जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतल्याबद्दल परळी वैजनाथ लिंगायत समाजातर्फे महाराष्ट्र शासनाचे आभार मानत निर्णयाचे स्वागत व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित, बेरोजगार व नव- उद्योजकांना अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. यामुळे युवकांना व्यवसाय उभा करण्यासाठी सरकार महामंडळा मार्फत पतपुरवठा करणार आहे. आर्थिक अडचणी असल्यामुळे लिंगायत समाजातील अनेक युवक व्यवसाय उभा करू शकत नव्हते. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून यामुळे समाजाच्या उन्नतीचे दार उघडले जाणार असल्याचे यावेळी अश्विन मोगरकर यांनी सांगितले.

यापूर्वी या महमंडळाच्या स्थापनेची मागणी अनेकांनी तत्कालीन शासनकर्त्याकडे केली होती. मात्र या सरकारने जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करत सरकारने हा एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया महादेव इटके यांनी यावेळी दिली. सरकारने समाजाच्या उन्नतीसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे, हा निर्णय फक्त हेच सरकार घेऊ शकते. जगतज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतल्याबद्दल परळी वैजनाथ वीरशैव समाजातर्फे महाराष्ट्र शासनाचे आभार मानत शुक्रवार दि 10 मार्च रोजी गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी परळी वैजनाथ लिंगायत समाजाचे महादेव इटके, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, विकास हालगे, सुशील हरंगुळे, सचिन स्वामी, नरेश पिंपळे, पवन तोडकरी, बंडू चौंडे, वैजनाथ ईटके, श्याम फडकरी, योगेश स्वामी यांच्यासह परळी वैजनाथ येथील लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!