MB NEWS:गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात

 गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात 

गेवराई....

दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    सादिक सिद्दीकी असे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत असून २३ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रारदाराच्या मामावर पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी ३ लाख रुपयाच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. लाच मागणे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस हवालदार भीमराज जीवडे, पो.ना पाठक, चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार