MB NEWS:प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांना "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार" जाहीर

 प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांना "राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार" जाहीर




अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात"राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्काराने" प्रख्यात रंगकर्मी प्रा.डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे यांना सन्मानित करण्यात येणार  आहे. जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात  दि.११ व १२ मार्च २०२३ रोजी संमेलनाध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील,उद्घाटक ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, मा.खा. रजनीताई पाटील,मा. खा.इम्रान प्रतापगडी,आ.नानाभाऊ पटोले,प्रमुख अतिथी मा.पंडितराव दौंड,आ. नमिता मुंदडा, वसंतराव मोरे, गोविंदराव देशमुख ,चंदूलाल बियाणी, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विद्याधर पांडे, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब आणि संयोजन समितीने  जाहीर केले आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.


कवी-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक आणि संशोधक म्हणून प्रा. सिध्दार्थ तायडे सर्वपरिचित आहेत.

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा कला क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी आहे.त्यांनी अनेक नाट्यकृतींचे दमदार सादरीकरण केले आहे. त्यांच्या लघुपटांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत. सिल्व्हर ओक फिल्म्स  प्रोडक्शनच्या प्रसिध्द उद्योजक मनोज कदम ,अमृत मराठे निर्मित आणि प्रख्यात लेखक दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या आगामी ग्लोबल आडगाव या चित्रपटातून ते अभिनेता-सह दिग्दर्शक म्हणून रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.प्रसिद्ध रंगकर्मी प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांना

भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय,नवी दिल्ली यांचा "ज्युनिअर रिसर्च स्कॉलर फेलोशीप सन्मान",

 ,फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांचा "गुणवत्ता सन्मान",उत्कल युवा सांस्कृतिक संघ, सांस्कृतिक मंत्रालय ओरिसा व ईस्टर्न झोनल कल्चरल सेंटर कलकत्ता यांचा "राष्ट्रीय  युवा कलावंत  सन्मान",,इंडियन नेट-सेट असोशिएशनचा "विद्याभूषण पुरस्कार" , सा.शिक्षणमार्गचा "शिक्षक गौरव पुरस्कार",पत्रकार संघाचा "दर्पण सिने-नाट्य गौरव पुरस्कार" मथुराबाई पिंगळे शिष्यवृत्ती सन्मान,

कै.गोपिकामाय देशपांडे विशेष गुणवत्ता सन्मान,कै. धनंजय बोधले  राज्यस्तरीय "काव्य प्रतिभा पुरस्कार",

फाईट फॉर राईट, तर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर "कला गौरव पुरस्कार"

"अश्वघोष नाट्यकर्मी पुरस्कार"(बोद्ध साहित्य परिषद,महाराष्ट्र).,

इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिव्हल"सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट पुरस्कार",

कल्ट सिनेमा राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल "राष्ट्रीय सामाजिक जागरूकता पुरस्कार",विंटेज रिल्स फिल्म फेस्टिव्हल "सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमा पुरस्कार",रंगकर्मीं प्रतिष्ठान आयोजित उदगीर नॅशनल फिल्म फेस्टिव्हल:"स्पेशल ज्युरी सन्मान" शिवाज्ञा  बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे कलारत्न पुरस्कार,तसेच रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरचा कला पुरस्कार आदी  पुरस्कारांसह राज्य,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाट्य, लघुपट,काव्य स्पर्धेतून अनेक पारितोषिके- सन्मान प्राप्त झालेले आहेत. प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभासद असून ते सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक-शैक्षणिक पदभारही लीलया पार पाडत आहेत.संस्थापक-सचिव,परळी सिने-नाट्य कलावंत संघटना.,

जिल्हा सांस्कृतिक कार्यवाह, बीड ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,

सचिव:-रंगोन्मेष,सम्यक थिएटर्स,अपूर्व मनोरंजन,.अध्यक्ष मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक  सेवा प्रतिष्ठान,अंबाजोगाई,मार्गदर्शक आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, जालना.,उपाध्यक्ष,जगतगुरु  तुकोबाराय साहित्य परिषद,ता. परळी वैजनाथ., बीड जिल्हा सचिव मराठी कवी लेखक संघटना महाराष्ट्र राज्य या पदांवर प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे आपले साहित्यिक-सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक योगदान देत आहेत.

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांना  राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा. आमदार शिवाजीराव चोथे साहेब,प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,डॉ. संभाजी चोथे,श्री.विनायक चोथे,प्रा. प्रमोद जायभाये, गौरख चोथे,प्रा. भगवान मिरकड,डॉ. राजू सोनवणे, डॉ. गणेश चंदनशिवे,राजन खान,प्रेमानंद ग्जवी, प्रा. दत्ता भगत, डॉ. सतीश पावडे, डॉ. संजय देवळाणकर,डॉ. मंगेश बनसोड, डॉ. प्रवीण भोळे, प्रकाश त्रिभुवन,डॉ. सतीश साळुंके, डॉ. संपदा कुलकर्णी,आबासाहेब वाघमारे,रानबा गायकवाड,बलभीम तरकसे, ऍड. अनंत जगतकर,

प्रोफेसर संजय जाधव,डॉ. अनिलकुमार साळवे, मनोज कदम,अमृत मराठे,डॉ. संजीवनी साळवे, डॉ. विलासराज भद्रे,प्रा. स्मिता साबळे,डॉ.अशोक बंडगर,   राजू वाघमारे,प्रा. गजानन दांडगे, डॉ. वैशाली बोदले,ऍड दिलीप उजगरे,डॉ.

उंडणगावकर,विश्वांभर वराट,डॉ. राजेश इंगोले,  प्रा.संतराम कराड ,अविनाश मुडेगावकर,

चंद्रकांत हजारे,चंद्रकांत वडमारे, सखा गायकवाड, बालासाहेब इंगळे,डॉ. रमेश इंगोले, बालाजी कांबळे,डॉ. देवराव चामनर ,प्रा.शंकर सिनगारे, डॉ. बबन मस्के,आसिफ अन्सारी,प्रकाश बोरगावकर,संपादक सतीश मोरे,पत्रकार दादासाहेब कसबे,जगन सरवदे, रणजित डांगे, परमेश्वर गित्ते,महादेव गोरे,गजानन मुडेगावकर,डॉ. संतोष रणखांब,विकास वाघमारे,संतोष बारटक्के आदींनी प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. सिद्धार्थ तायडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !