MB NEWS:आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार

 सिरसाळ्याच्या अंबाजोगाई पीपल्स बँकेत कॅशियरने केला 19 लाखांचा अपहार




आत्महत्या करत असल्याचा मेसेज करुन कॅशियर फरार


सिरसाळा : येथील अंबेजोगाई पीपल्स बँक शाखेत कॅशयीर पदावर असणारे सुनील अशोक देशमुख यांनी १९ लांखाचा अपहार केल्याची तक्रार शाखा व्यवस्थापकांनी सिरसाळा पोलीसात दिली आहे.

       दिनांक ९ मार्च रोजी कॅशियर सुनिल देशमुख सायंकाळ पासुन सिरसाळा येथून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांचे बंधु प्रशांत अशोक देशमुख यांनी दिनांक १० मार्च रोजी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे येवून दिली. तक्रारीत प्रशांत देशमुख म्हणाले कि,

माझा भाऊ सुनील देशमुख यांने मोबाईल वर मेसेज केला की बँकेतील कर्मचारी पैशांचा घोटाळा करत आहेत व तो सर्व घोटाळा माझ्या अंगलट येणार असल्याने मी आत्महत्या करत आहे. दरम्यान कॅशियर देशमुख बेपत्ता झाल्याचे समजल्याने बँक मॅनेजर यांनी बँकेत रक्कम तपासली असता १९ लाख रुपये तिजोरीतून गायब असल्याचे निदर्शनास आले.  मॅनेजर इंगळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे कॅशयर सुनील देशमुख यांच्या विरोधात अपहार प्रकरणी तक्रार दिली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !