इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी

 पंकजाताई मुंडे यांनी कौठळीच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला !






पद्मावती नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर


पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ  मतदारसंघात रस्त्यासाठी आणले ३२ कोटी


परळी वैजनाथ ।दिनांक १२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडून मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने वेगवेगळ्या   रस्त्यासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. कौठळी येथील पद्मावती नदीवरील पुल बांधकामासाठी २ कोटी ५० लाखाचा निधी आणून त्यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. सरपंच व ग्रामस्थांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 


    पंकजाताई मुंडे नेहमीच परळी मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असतात. पालकमंत्री असताना त्यांनी कधी मिळाला नाही एवढा कोटयवधीचा निधी आणून विकास कामं केली  आणि आता  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत, शिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्यांनी विविध गावच्या रस्त्यासाठी सुमारे ३२ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. कौठळी येथे परवा झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कार्यक्रमात गावांतील पद्मावती नदीवरील पुलाचा प्रश्न सोडविण्याचा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला होता. या पुलासाठी अडीच कोटीचा निधी सरकारकडून मंजूर करून घेत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला.


    पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नातून राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी पुढीलप्रमाणे -  घाटनांदूर ते नवाबवाडी रस्ता सुधारणा १ कोटी ५० लाख, ग्रामा ५३८ (डी) ते जोडवाडी धसवाडी रस्ता सुधारणा - १ कोटी, कुसळवाडी ते मूर्ती रस्ता सुधारणा १ कोटी ५० लाख), चंदनवाडी ते लिंबगाव रस्ता सुधारणा १ कोटी ५० लाख, प्रजिमा ५८ ते भारज सायगाव रस्ता १ कोटी, खापरटोन दैठणा रस्ता सुधारणा १ कोटी ५० लाख, तडोळा  येथे मांजरा नदीवर पुलाचे बांधकाम - ११ कोटी, अंबावळण ते पोखरी रस्ता सुधारणासाठी १ कोटी २५ लाख, अंबावळण ते भारज पांदण रस्ता सुधारणा - १ कोटी २५ लाख, सायगाव-सुगाव ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा - ५१ लाख,  राडी मुडेगाव रस्ता सुधारणा - १ कोटी, राडी तांडा ते मुडेगाव रस्ता सुधारणा - १ कोटी, दैठणा जोड रस्त्यावर पुलाचे बांधकाम १ कोटी, खतगव्हाण ते पोहनेर रस्ता सुधारणा ३ कोटी आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय आपेगाव-अकोला रस्त्यासाठी ५ कोटी आणि दस्तगीरवाडी-पोखरी रस्त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!