MB NEWS:सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक

 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांना मातृशोक

प्रयागबाई बळीराम शेळके यांचे  निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. 


याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


प्रयागबाई शेळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे रविवारी दुपारी 5 वाजता करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार