परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:धुळे जिल्हा न्यायालयातील अजब प्रकार

 वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा; फोटो काढून मौलानाला पाठवला




धुळे जिल्हा न्यायालयातील अजब प्रकार 


धुळे :धुळे जिल्हा व सत्र,, न्यायालयात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोर्टात वकील काम करतेवेळी वकिलाचं तोंड बंद करण्यासाठी एका इसमाने चक्क जादूटोणा केला असल्याचे कळताच वकील वर्गात एकच खळबळ उडाली.

         धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात आज रोजी घडला आहे.धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाचे फोटो काढून नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअपद्वारे पाठवून वकिलाने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याची बोलती बंद व्हावी, यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

             धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे जेष्ठ विधीज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील ॲड.शामकांत रावजी पाटील यांच्या फिर्यादीवरून निसार शेख अमीर खाटीक याच्या विरोधात नरबळी आणि इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदानुसार धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                    निसार शेख अमिर खाटीक विरुद्ध पंढरीनाथ भिला पाटील यांच्या विरोधात दिवाणी दावा क्र २१९/२०१६ प्रमाणे धुळे येथील दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये चालू असलेल्या सदर दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये पंढरीनाथ भीला पाटील यांचे वकील ॲड. शामकांत पाटील यांनी जास्त बोलू नये किंवा त्यांची बोलती बंद करण्यासाठी न्यायालयाची इमारत व आवारामध्ये विना परवानगी पक्षकार पंढरीनाथ भिला पाटील आणि त्यांचे वकील शामकांत पाटील यांचे फोटो जादुटोणा करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एका मौलानाच्या मोबाईल व्हॉट्सअपवर पाठविले. ही बाब ॲड.शामकांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित संशयित आरोपी निसार शेख आमिर खाटीक याची चौकशी करून मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याने ही बाब उघडकीस आली.

               ॲड.शामकांत पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी निसार शेख समीर खाटीक राहणार देवपूर याला शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!