MB NEWS:बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची नायालयीन कोठडीत रवानगी

 बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची नायालयीन कोठडीत रवानगी




अंबाजोगाई - तालुक्यातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय वृद्धास पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि.०९) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २१ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 


अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेस चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दाखवून विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) अने तिच्यावर अत्याचार केला होता. पिडीत मुलीचे पोट दुखू लागल्याने या कुकर्माला वाचा फुटली होती. पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  विष्णू सादुळे याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काचा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला तत्काळ बेड्या ठोकून पोलिसांनी सोमवारी (दि.०६) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २१ मार्चपर्यंत आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, या अत्याचार प्रकरणाचे अंबाजोगाईत संतप्त पडसाद उमटले होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत आरोपीला कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार