MB NEWS:बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ

 संगणक शिक्षणासाठी कामगार पाल्यांना २ लाखाचे अर्थसहाय्य मंजूर 

बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ


परळी (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्स करणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते.

बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार व कामगार पाल्यांनी एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्से उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना कामगार कल्याण मंडळातर्फे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले.

कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, एम.एस.सी-आयटी हा कोर्स पूर्ण करून व्यवसाय करता यावा तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी या योजनेंतर्गत अर्थसहाय्य करून प्रोत्साहन दिले जाते.

यंदाच्या वर्षात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार पाल्यांना २ लाख २ हजार ९५० रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेली रक्कम लाभार्थींच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


---‐------‐----------------------------------------

कामगारांची मुले संगणक शिक्षणात पुढे यावी. संगणक शिक्षणातून आर्थिक सक्षम व्हावी म्हणुन ही योजना राबविण्यात येते.

कामगारांच्या घरातील सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

-भालचंद्र जगदाळे,

कामगार कल्याण अधिकारी.

‐---------------------------------------------------


कामगार व कामगार पाल्यांनी  एम.एस सी-आयटी हा कोर्स ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यास व संगणक शिक्षण घेण्यासाठी  भारलेल्या फीसच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते. या योजनेचा अर्ज दरवर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने भरणा करावा  लागतो. या योजनेचा लाभ कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेले कामगार घेऊ शकतात.

                 -आरेफ शेख 

केंद्र संचालक ,कामगार कल्याण केंद्र.

-----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !