इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर

 यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर



 परळी प्रतिनिधी ---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक व इतिहास विभाग प्रमुख  डॉ.  बाबासाहेब शेप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केद्र प्रमुख डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार प्रेरणादायी होते ते आजच्या युगात आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या सुधारणा करून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या कार्यामुळेच मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण हे नाव देण्यात आले असावे असे वाटते. यावेळी या कार्यक्रमाला केंद्र संयोजक, डॉ.बी. के. शेप, केंद्र सहाय्यक प्रोफेसर, डॉ. आर. डी. राठोड, आय क्यू एसी समन्वयक डॉ.बी. व्ही. केंद्रे, प्रोफेसर डॉ.व्ही. बी. गायकवाड, प्रा समीर रेणूकादास, डॉ. टी. ए. गित्ते, पर्यवेक्षक प्रा. मंगला पेकमवार, प्रा. राजू गोरे, प्रा. मनोज फड, प्रा. मोकळे, प्रा. लोखंडे, श्री प्रभाकर मुंडे, जी बी किटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक डॉ. बी के शेप तर आभार प्रोफेसर डॉ. आर. डी. राठोड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!