इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

 अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचा मृत्यू




सकाळी 8 वाजता घडला अपघात; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

दिवसेंदिवस परळी शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्याने सुसाट आणि अनियंत्रित मोटारसायकली पळवण्याचे सर्रास प्रकार होत असून, याचा फटका एका पोलीस कर्मचाऱ्यालाच रविवारी बसला. अतिप्रचंड वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या वयोवृद्ध आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सदरील घटना घडली.


अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय - 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. 


याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या.  उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!