MB NEWS:जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीकडून कु.सान्विला वैद्यकीय मदत


 जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीकडून कु.सान्विला वैद्यकीय मदत

सान्वीच्या उपचारासाठी सर्वतोपरी वैद्यकीय मदत करणार –सुषमा अंधारे

परळी (प्रतिनिधी)

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने थायलोसेमिया या अत्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हीला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. थायलोसेमिया या आजाराने ग्रस्त असतांना त्यावरील उपचारासाठी तीला जवळपास ३० लाखांचा खर्च येतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तीच्या उपचारासाठी परळी शहरातून मदत गोळा करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक भावनेला जोपासत या मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पक्षाच्या वतीने सान्वीच्या सर्व वैद्यकीय उपचाराची आर्थिक जबाबदारी घेतली.

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार, दि.१० मार्च रोजी शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सव समितीकडून अनावश्यक खर्चाला फाटा देत अत्यंत साधेपणाने जयंती साजरी केली. यातून बचत झालेला निधी कु.सान्वीच्या वैद्यकीय उपचारासाठी देण्यात आला. दरवर्षी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाच्या जयंती दिनानिमित्त अत्यंत गरज असलेल्या रूग्णाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शुक्रवारी संपन्न झालेल्या शिवजयंती उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, परळी येथील आर्य समाज गुरूकुलचे श्री पंडीत सोममुनीजी, पंडीत श्री आर्य मुनिजी श्रध्दानंद गुरूकुल, ह.भ.प.भरत महाराज जोगी (काळभैरव संस्था परळी) रामायणाचार्य ह.भ.प.भरत महाराज गुट्टे (संत भगवान बाबा संस्था, परळी), अभयकुमार ठक्कर (संस्थापक, जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समिती), प्रा.अतुल दुबे (मार्गदर्शक, जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समिती), मदन परदेशी (शिवसेना तालुका प्रमुख, अंबाजोगाई), राजाभाऊ लोमटे (मा.उपजिल्हा प्रमुख, अंबाजोगाई), विनायक बप्पा मुळे (मा.तालुका प्रमुख, वडवणी), सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, अरूण पाठक, प्रल्हाद सावंत आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

शुक्रवारी संपन्न झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे म्हणाल्या की, जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीकडून सान्वीच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत निधी देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. सान्वीला मुंबईच्या सामाजिक संस्थांकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीनेही शक्य तेवढे प्रयत्न या चिमुकलीच्या उपचरीरसरासाठी केले जातील असेही त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याच कार्यक्रमात वैद्यनाथ भक्ती मंडळाला भगवे ध्वज भेट देण्यात आले. अनेक वक्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारावर आधारीत आपले मतप्रदर्श व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश जगताप, जगन्नाथ साळुंके, संजय कुकडे, सुरेश परदेशी, किशन बुंदेले, बबन ढेंबरे, प्रा.जगदीश कावरे, अमित कचरे, सचिन लोढा, प्रविण किस्ते, किशोर गित्ते, संतोष घुले, कृष्णा मुंडे, शिवा सोनटक्के, राजू बोकन, सिध्दार्थ गायकवाड, रंजीत साळवे, माऊली अटपळकर, हनुमंत मुंडे, महादेव ढेंबरे, कृष्णा मुंडे, बालासाहेब मुंडे, श्रीनाथ नागरगोजे, बळीराम मुंडे, हनुमंत जाधव, किशोर साळवे, नामदेव कांबळे, धम्मा बचाटे, विष्णू मुंडे, कृष्णा रायभोळे, बळीराम सातपुते, मजीद बाबू शेख, तुकाराम साठे, दिलीप शिंदे, सचिन साठे, विश्वजित भिसे, बजरंग औटी, मनिष जोशी, लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार आदींनी अथक परिश्रम घेतले.




 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !