MB NEWS:बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी चार आरोपी जेरबंद !

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


माजलगाव, दि.१०: येथील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींना अखेर बीड स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या चार आरोपीना पुढील तपास करीत माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, दि.07 मार्च 2023 रोजी फिर्यादी श्री. अशोक तुळसिराम शेजुळ धंदा – व्यापार रा. गजानन नगर माजलगाव हे त्यांचे स्कुटीवर घराकडे जात असतांना त्यांचे पाठीमागुन कोणीतरी दोन किंवा तीन मोटारसायकल वरुन पाच ते सहा अनोळखी इसम हे तोंडाला रुमालाने झाकलेले असस्थेत असलेले अंदाजे 20 ते 30 वयोगटातील यांनी ओव्हरटेक करून लोखंडी पाईपने दोन्ही पाय व हातावर, गालावर फिर्यादीस मारहाण करून गंभीर जखमी केले व मोटार सायकलवर पसार झाले. वगैरे फिर्याद वरुन पो.ठा. माजलगाव शहर गुरनं 83/2023 कलम 147, 148, 149, 307, 120 (ब) भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी आदेश दिल्याने श्री. सतिष वाघ, पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. बीड यांनी आरोपी शोध घेण्यासाठी तात्काळ दोन पथके रवाना केली. स्था. गु. शा. पथक आरोपीचे शोध कार्य चालु असतांना पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा 1) अविनाश बाळासाहेब गायकवाड, 2) विजय शिवाजी पवार, 3) संदिप बबन शेळके रा. पुरुषोत्तमपुरी, 4) सुभाष बबन करे रा. पुरुषोत्तमपुरी, 5) शरद भगवान कांबळे रा. पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव यांनी मिळुन केला आहे. या माहितीवरुन सदर गुन्हयातील चार आरोपी नामे 1) अविनाश बाळासाहेब गायकवाड वय 26 वर्षे रा. पुनंदगाव, ता. माजलगाव, 2) संदिप बबन शेळके वय 22, 3) सुभाष बबन करे वय 27, 4) शरद भगवान कांबळे वय 29, तिन्ही रा. पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव यांना माजलगाव येथील लोकसेवा हॉटेल जवळुन ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन सदर चार आरोपीतांना वर नमुद गुन्हयात पो.ठा. माजलगाव शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन माजलगाव शहर करीत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार