MB NEWS:दोन कोटींच्या विकास कामांचा थाटात शुभारंभ

अर्ध्या रात्रीपर्यंत जागून चारदरीकरांनी केले खा. प्रीतमताई यांचे जंगी स्वागत


दोन कोटींच्या विकास कामांचा थाटात शुभारंभ


किल्ले धारूर, प्रतिनिधी :- तालुक्यातील चारदरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व ईतर विविध विकास कामांचे भूमीपुजन बीडच्या लोकप्रीय खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजित कार्यक्रम आणि ठिकठिकाणी होणारे स्वागत यामुळे खा. प्रीतमताई यांना चारदरी  येथे येण्यास रात्र झाली. परंतू विकासाची गंगा घेऊन येणार्‍या लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी अबाल- वृध्दांसह सारे गाव अर्ध्या रात्रीपर्यंत जागे होते. सरपंच दत्ताभाऊ मुंडे यांच्या नियोजनात गावकर्‍यांची फुलांच्या उधळण करत भव्य अशी मिरवणुक काढल्यानंतर रात्री उशीरा विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले.
स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना त्यांची लोकप्रीयता आणि जागोजाग होणार्‍या स्वागतामुळे कार्यक्रमाला नियोजित वेळेत कधीच जाता आले नाही. लोकनेते मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकींना देखील लोकांचे प्रेम मिळत आहे. यामुळे त्यांना देखील कोणत्याही कार्यक्रमाला नियोजित वेळेत पोचता येत नाही. याची प्रचिती धारूर तालुक्यात दुर्गम डोंगरात असलेल्या चारदरी येथे आली. येथे प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 17 लक्ष रूपयांची जलजीवन योजना, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमीचे बांधकाम, शाळेसाठी संरक्षक भींत व पेव्हर ब्लॉक बसवण्याचा कार्यक्रम गुरूवारी (दि.9) सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. परंतू दिवसभराचे विविध ठिकाणाचे कार्यक्रम, गावा- गावात होत असलेले स्वागत आणि सत्कारामुळे रात्री 10:30 वाजता खा. प्रीतमताई मुंडे यांचे चारदरी गावात आगमन झाले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल साडेतीन तास अधिक वेळ झाला तरी गावातील अबालवृध्द खा. प्रीतमताई मुंडे यांच्या स्वागतासाठी जागेच होते. त्यांचे गावात आगमन होताच सरपंच दत्ताभाऊ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून भव्य अशी स्वागत रॅली काढण्यात आली. प्रत्येक घरातील महिलेने फुलांची उधळन करून खा. मुंडे यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. स्वरूपसिंह हजारी, रमेशराव आडसकर, माजी आमदार केशवराव आंधळे, मोहनराव जगताप, राजाभाऊ मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जेष्ठ नेते सोमनाथराव बडे, बन्सी मुंडे, सुधाकर लांब, महादेव तोंडे, सुनील शिनगारे, तालुकाध्यक्ष बालासाहेब चोले, शिवाजी मायकर, डॉ.नितीन चाटे, डॉ.तुकाराम मुंडे, डॉ.आत्माराम मुंडे, डॉ.भगवान तोंडे, डॉ. शिवदास तिडके, डॉ .प्रशांत घुले, विनायकराव शिनगारे यांच्यासह गावातील महिला, पुरूष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


लोकनेते स्व. मुंडे साहेबांचे अधुरे
स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंद

        चारदरी येथील कार्यक्रमात बोलताना खा. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी विकासाची गंगा प्रत्येक गावात गेली पाहीजे. ईथल्या तळागाळातील मानसाचा, वंचीत- उपेक्षीत- कष्टकरी आणि मजूरांचा सर्वांगीन विकास झाला पाहीजे, असे स्वप्न पाहीले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून लोकनेते स्व. मुंडे साहेब यांचे प्रत्येक अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न टप्प्या- टप्प्याने करत आहे, असे खा. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !