पोस्ट्स

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव

इमेज
  नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील नैसर्गिक सानिध्यात असलेला एकमेव जॉगिंग ट्रॅक आहे. नगर परिषदेने येथे तात्काळ हायमास्ट लॅम्प बसवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केली आहे.  वैद्यनाथ महाविद्यालयाच्या या जॉगिंग ट्रॅकवर परळी शहरातील युवक - युवती दररोज विविध प्रकारचे खेळ खेळतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मैदानात सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी वयोवृद्ध महिला व पुरुष मंडळी पण बहुसंख्येने येत असतात. परंतु या मैदानाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने  जॉगिंग ट्रॅक वर येणाऱ्या युवकांसह नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी सोबतच सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. त्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवेश्वर कॉलनीतील वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर नगर परिषदेने हायमास्ट लॅम्प तात्काळ बसवावेत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी

इमेज
  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता; फसवेगिरी करणाऱ्यांकडून होणार सक्त वसुली - धनंजय मुंडे अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच नागपूर (दि. 15) - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यीतअत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ.अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल श्री मुंडे बोलत होते.  अकोला जिल्ह्यात स

शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती

इमेज
  केंद्रीय पथकाकडून जिल्हयातील दुष्काळाची पाहणी शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती    बीड, दि. 14 (जि. मा. का.)खरिप हंगामात झालेला कमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच भुजल पातळीत झालेली घट व संभाव्य पाणी टंचाई यापार्श्वभुमीवर केंद्रीय पथकानी आज बीड जिल्हयात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थ्ा व अधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली.         पथकाने जिल्हयातील बीड, वडवणी धारुर तसेच शिरुर कासार मधील अनेक ठिकाणी भेट दिली. केंद्रातील  कृषी सचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्हयात आले होते.           या पाहणी दौ-यात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे परविक्षाधीन भा.प्र.से.अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर,  तहसीलदार सुहास हजारे आदिंची उपस्थिती होती.        या पथकाने बीड तालुक्यातील घोडका राजूरी तसेच वडवणीतील पोखरी, ढोरवाडी, वडवणी, चौफलदरी तांडा, मोरवड, पुसरा, धारुरमधील भोपा, शिरुरमधील मालकाची वाडी, हिवरसिंग, खोकरमोहा, रायमोहा आदि गावात पिकांची तसे

टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप

इमेज
  टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप         बीड, दि. 14 (जि. मा. का.) बीड: शहाजानपूर रुई येथील रहिवाशी कै. प्रमिला श्रीराम घुमरे यांचा हृदय विकाराचा झटक्यामुळे दि. 3 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन बिमा दि. 12 मार्च 2020 रोजी घेतला होता.त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांचे पती श्रीराम अशोक घुमरे यांना टपाल जीवन बिमा योजनेतून रु.११०८५२५/- रुपयांचे धनादेश अधीक्षक डाकघर, बीड विभाग बीड डी.आर.शिवणीकर, अधीक्षक डाकघर बीड विभाग,बीड यांच्या हस्ते हेड पोस्ट ऑफिस येथे दि. 11 डिसेंबर 2023 रोजी वाटप करण्यात आला.          डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी चागली आहे.या योजनेत हफ्ता कमी व लाभ जास्त मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी यांना दहा लाखाचा तर सरकारी कर्मचारी,डॉक्टर, इंजिनिअर, NSE/ BSE यांचे कर्मचारी यांना देखील पन्नास लाखा पर्यंत चा विमा घेता येतो. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान डी.आर.शिवणीकर डाकघर बीड विभाग बीड यांनी केले आले. यावेळी पोस्टमास्तर एच.एस.

समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ

इमेज
सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन          बीड, दि. 14 (जि. मा. का.) जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो या लोकशाही दिनामध्ये शासन आदेशान्वये महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो.        तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बीड येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी

इमेज
  अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी परळी -  सोलापूर येथे घेण्यात आलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत Level-1 मध्ये  येथील संस्कार प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. अनघा लक्ष्मी सूर्यकांत नावंदे हिने चॅम्पियन पारितोषिक प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे  शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी तांदळे , शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.              "शाळेत मागील तीन वर्षापासून इयत्ता पहिली पासून अबॅकसचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, कल्पनाशक्ती, तार्किक क्षमता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता इत्यादी मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे."        - दीपक तांदळे परळी

अभिनंदनीय: राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड

इमेज
  विभागीय स्केटींग स्पर्धेत कु. भार्गवी कराडला 3 सुवर्ण पदक राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड  छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची नामवंत खेळाडू कु. भार्गवी नामदेव कराड हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विभागीय कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विभागीय स्केटींग स्पर्धेमध्ये तब्बल 3 सुवर्ण पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली. कु.भार्गवी हीने आजवर अनेक स्केटींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत गौरवास्पद यश मिळविले आहे. ज्ञानदा इंग्लिशन स्कूलमध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या भार्गवी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींग स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानस केला आहे. तीचा हा मानस पूर्ण करण्यासाठी भार्गवी दिवसरात्र मेहनत घेत आहे. अगदी कमी वयात भार्गवीने मिळविलेले यश कौतूकास्पद असून आगामी काळात देखील अशा प्रकारचे यश ती नक्कीच मिळवेल आणि यासाठी आमचे आशिर्वाद तीच्या सोबत असल्याचे भार्गवीच्या आई-वडील यावेळी सांगितले. हे सुवर्ण यश मिळविण्यासाठी ज्ञानदा शाळेचे मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, भाटकर स्केटींग अकॅडमीचे कोच

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण

इमेज
  पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे नागपूर (दि. 14) - केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.  पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार शी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यांपैकी 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.  पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफत्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात अली आहे. त्याचप्रमाणे जे

प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंची माहिती

इमेज
  मागेल त्याला शेततळे' योजना अधिक व्यापक करणार - धनंजय मुंडे कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ कोकणातील शेततळ्यांसाठी दरफरक दूर करण्यासाठी व्यापक बैठक घेऊन निर्णय घेणार प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंची माहिती नागपूर (दि.14) - 'मागेल त्याला शेततळे' ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.  'मागेल त्याला शेततळे' योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला असता धनंजय मुंडे यांनी याबाबतची सविस्तर आकडेवारी विधानसभा सभागृहात मांडली.  शेततळे मंजूर करणे कृषी विभाग करत असला, तरी राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभाग

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  परळीतील सामाजिक क्षेत्रातील कार्यतत्पर युवक हरवला;अजय पुजारी यांचे  निधन परळी/प्रतिनिधी          परळीच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यतत्पर सेवाभावाने कार्यरत असणारा युवक व सर्वपरिचित दैनिक मराठवाडा साथी चे कर्मचारी अजय पुजारी यांचे मंगळवारी (ता.१२) रात्री दहा च्या सुमारास निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे (वय-४३) वर्षे होते. परळी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा कायम सहभाग असायचा.         परळी शहरातील खंडोबाल्ली,गणेशपार येथील  रहिवाशी  अजय पुजारी हे मागील वर्षभरा पासुन आजारी होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता.१२) रात्री १०:०० च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभुमीत बुधवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.          गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरात सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणारा व सतत क्रियाशील युवक म्हणून अजय पुजारी यांची ओळख होती. जुन्या गावभ

शिरसाळा येथील एक जण मृत्युमुखी

इमेज
  माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात मोटारसायकल अडकुन एकाचा मृत्यू माजलगाव..... माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये मोटर सायकलचे चाक अडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.         खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी या महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये दररोज मोटरसायकल चोरांच्या मोटर सायकलचे चाक अडकून अपघात होण्याच्या घटना घडत असतात. मंगळवार रोजी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी अब्दुल हाफिज सत्तार खान ( ४९) हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपा समोर त्यांची मोटार सायकल एम.एच.३८ ए ७२१८ चे चाक भेगांमध्ये अडकल्याने मोटरसायकल जागेवरच पलटी झाली. या त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ही जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले. Click: ■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे* Video Ne
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)          लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Click: ■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे*         लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, डॉ लक्ष्मण मुंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ पंढरी गुट्टे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.डॉ लक्ष्मण मुंडे, प्रा.प्रसाद देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा फुटके, आभार प्रा.प्रविण नव्हाडे यांनी मानले. का

टोकवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित

इमेज
  टोकवाडी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांना जयंतीनिमित्त अभिवादन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टोकवाडी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी उपस्थितीत ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. यावेळी टोकवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंती निमित्त टोकवाडी येथील हनुमान मंदिर येथे गावाकर्यांच्या वतीने  जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान उपस्थितीत मान्यवरानी लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या आठवणीन  उजळा दिला.         Click: ■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे*        याप्रसंगी कार्यक्रमास  सुग्रीव बापू मुंडे, संजय मुंडे सर ,मारोती मुंडे गुरुजी, टी. डी. मुंडे, दीनानाथ आघाव, श्री वाल्मिक मुंडे, हबीब भाई, संदीपान काळे, शिवाजी मुंडे साहेब, उत्तम काळे, प्रकाश काळे, सुरेशराव आघाव, लहुदास मुंडे व सर्व

वैद्यनाथ मंदिर, बौध्द विहार, दर्ग्यात प्रार्थना ; गरजूंना ब्लॅकेट वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वितरण

इमेज
  लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून अलोट गर्दी पंकजा मुंडे, खा.डाॅ. प्रितम मुंडेंचा श्रमदान, रक्तदानासह सामाजिक सेवा उपक्रमात सहभाग वैद्यनाथ मंदिर, बौध्द विहार, दर्ग्यात  प्रार्थना ; गरजूंना ब्लॅकेट वाटप,  आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वितरण परळी / गोपीनाथ गड ।दिनांक १२। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची आज गोपीनाथ गडावर अलोट गर्दी उसळली होती. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी  शहरात व गडावर श्रमदान, रक्तदानासह  सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत मंदिर परिसरात स्वच्छता केली. बौध्दविहारात वंदना तसेच दर्ग्यावर चादर अर्पण करून प्रार्थना केली.     लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथास अभिषेक करून दर्शन घेतले, त्यानंतर मंदिर परिसरात कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहिम राबवली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील यात सहभागी झाले होते. सध्या थंडीचे दिवस  असल्यान

गोपीनाथगडावर पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने उपस्थितांचे ह्रदय सद्गदित !

इमेज
  गोपीनाथगडावर पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने  उपस्थितांचे ह्रदय सद्गदित ! गोपीनाथराव मुंडे तुमचा आमचा स्वाभिमान: त्यांचे विचार व संस्कार शतायुषी करण्याचा संकल्प करूया संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केला खंबीर विश्वास परळी वैजनाथ ।दिनांक १२।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे हा तुमचा- माझा -आपल्या सर्वांचा स्वाभिमान असून त्यांचे संस्कार व विचार हे शतायुषी करण्याचा संकल्प आज आपण करूया. गावागावापर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत मुंडे साहेबांचे विचार पोहोचविण्याचा हा संकल्प आहे.  मुंडे साहेबांनी दिलेला संस्कार- संघर्ष -स्थैर्य -स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचार सूत्रावर वाटचाल करताना आपले आयुष्य जनतेसाठी समर्पित आहे.यासाठी स्वतःचे काहीही होवो परंतु या मार्गावर वाटचाल करताना कधीही डगमगणार नसल्याचा खंबीर विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथगडावर बोलताना व्यक्त केला.      लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावात गोपीन

मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -आवाहन

इमेज
  मनोज जरांगे पाटील यांची अंबाजोगाईत सभा : परळी वैजनाथ ते सभास्थळ निघणार मोटार सायकल रॅली परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     मनोज जरांगे पाटील यांची अंबाजोगाईत सभा होणार असुन या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ ते सभास्थळ  मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.           सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वा. अंबासाखर कारखाना (वाघाळा) अंबाजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजी मंडई, गणेशपार रोड परळी वैजनाथ ते सभास्थळ मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.दि11/12/2023 वेळ: दुपारी 3 वा. रॅली निघणार आहे. बाबा रामदेव मंदिर - लक्ष्मीबाई टॉवर मोंढा मार्केट- एकमिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक मार्गे अंबाजोगाई येथील सभेकडे रॅली जाणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक,सकल मराठा समाज परळी वैजनाथ तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

पंकजाताईंचा साधेपणा ; भाविकांत बसून केले कथा श्रवण

इमेज
  पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीत श्रीराम कथेचा उत्साहात समारोप पंकजाताईंचा साधेपणा ; भाविकांत बसून केले कथा श्रवण परळी वैजनाथ ।दिनांक १०। चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेचा समारोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यासह हजारो  भाविक भक्तांच्या साक्षीने आज मोठया उत्साहात संपन्न झाला. पंकजाताईंनी भाविकांत बसून कथा श्रवणाचा लाभ घेतल्याने त्यांचा साधेपणा फुन्हा एकदा दिसून आला.     पुणे येथील चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी २ डिसेंबर पासून श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा समारोप आज झाला. राम कथा निरूपणकार श्री रविंद्र पाठक यांच्या सुश्राव्य आणि संगीतमय रामकथा श्रवणाचा हजारो भाविक भक्तांनी यावेळी  लाभ घेतला. आजच्या समारोपाला भाजप नेत्या पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या, त्यांनी भाविकांत बसून कथा श्रवण केले, कथा समाप्तीनंतर त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली, यावेळी निरूपणकार पाठक यांनी त्यांचा आशीर्वाद रूपी सत्कार केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना पंकजाताईंनी श्रीरामकथा ही परळीकरांसाठी मोठी पर्वणी ठरल्याच

सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर

इमेज
  सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या 23 व्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठेचा 2023 राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन अरविंद सौंदळे सर यांना जाहीर झाला असून  रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सोनपेठ येथे एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोनपेठ येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या वितरण सोहळ्यास अनेक गुरूवर्य शिवाचार्य महाराज तसेच विशेष उपस्थिती म्हणून परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,सोनपेठ चे तहसीलदार श्री.सुनील कावरखे,मुख्याधिकारी कोमल सावरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अंधारे,महाराष्ट्र वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी,वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त जेष्ठ नेते विजयकुमार मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे हे राहणार आहेत.  या कार्यक्रमास परळी शहर व प

भेल स्कूल मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
भेल स्कूलमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे   जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद   लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती प्रतीवर्षी उत्साहात विविध उपक्रमाने सर्वदूर साजरी होत असते. याही वर्षी परळी शहरातील नामांकित व सर्वात जुनी असणारी भेल सेकंडरी स्कूल, या विद्यालयात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची सुरुवात आज विद्यालय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेऊन करण्यात आली. इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी "ग्लोबल वॉर्मिंग " व 9वी ते 10वी या गटासाठी "संघर्षयोद्धा" हे विषय ठेवले होते.  वरील विषयांवर विद्यार्थ्यांनी तयारी करून,आपला प्रभावी सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवून- आपला ठसा उमटवला.या स्पर्धेमध्ये एकूण 50 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण, 12 डिसेंबर म्हणजेच साहेबांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते जाहीर होईल. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील अनुभवी व उत्कृष्ट शिक्षक श्रीमान जयंत अयाचित सर व उत्कृष्ट सहशिक्षिका सौ, सुमेधा कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे नियोजन कलोपासक मंड

जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी   बीड, 8: (जीमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.   जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन  आदरांजली वाहण्यात आली.   याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रभारी गौण खनिज अधिकारी महादेव काळे, नायब तहसीलदार टाक, शिवशंकर मुंडे,राम घडशे,गोटुराम गोरेल, आदी कर्मचारी उपस्थित होते.

परळी मतदारसंघास 380 कोटी

इमेज
  हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून बीड जिल्ह्याला हजारावर कोटींचा निधी! पालकमंत्री धनंजय मुंडेंची कोटी-कोटींची उड्डाणे! सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना व पुलाच्या कामांवर निधीचा वर्षाव परळी मतदारसंघास 380 कोटी अनेक प्रशासकीय इमारतींचे काम लागणार मार्गी परळी वैद्यनाथ (दि.08) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा ध्यास घेतला असून, यासाठी केवळ घोषणा करून, बोलून मोकळे न होता, धनंजय मुंडे यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांना निधी मिळवून, बोललेला शब्द खरा करून दाखवला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने, महत्वाचे रस्ते व पूल, शासकीय रुग्णालये, त्यातील सुविधांचा विकास आदी अनेक कामांसाठी एक हजार कोटी पेक्षा अधिक निधीस हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  या बद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

इमेज
  स्वाराती रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग होणार सुपर स्पेशालिटी दर्जाचा! वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता नांदेडच्या घटनेनंतर आ. नमिता मुंदडांनी केलेल्या मागणीला यश अंबाजोगाई - एमबी न्युज वृत्तसेवा  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बालकांच्या मृत्युच्या दुर्दैवी घटनेनंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुसज्ज असावे जेणेकरून रुग्णांच्या जीवितास धोका होणार नाही यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाची व्हावीत अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटी प्रमाणे करण्यासाठी (मोड्युलर ओटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातून होणारा जंतुसंसर्ग कमी होऊन रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्याबद्दल केज मतदार संघातील जनता आ. मुंदडा यांचे आभार मानत आहे.

अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून

इमेज
  अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून अंबाजोगाई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ मोंढा रोडवर एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी (दि.०८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.  राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात राजेंद्र यांचा जागेवर मृत्यू झाला. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून यामागे जागेच्या वादाचे कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ••••••••••••••••••••••••

जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान

इमेज
  जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान  परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दिल्ली येथील राजनीति व प्रशासनाचे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध जनहित याचिकाकर्ता  सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ  अश्विनी कुमार उपाध्याय यांचे आज रोजी वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. '' भारतीय राजनीति व प्रशासन यात अमुलाग्र बदलाची आवश्यकता'' एक संवाद असा विषय घेण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री बाजीराव भैया धर्माधिकारी हे असून माननीय राजेश देशमुख यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा, भास्कर मामा चाटे सामाजिक कार्यकर्ते, विनोद  सामत चेअरमन वैद्यनाथ बँक , रवी सानप पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन,  जुगलकिशोर लोहिया माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, जेष्ठ विधिज्ञ वैजनाथ नागरगोजे, जेष्ठ विधिज्ञ राजेश्वर देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.      तरी अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानासाठी आपण ऊपस्थिती रहावे असे आवाहन प्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा,  दंत रोग तज्ञ डॉक्टर दे. घ.मुंडे,परळी समाचार चे संपाद

विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

इमेज
  विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित परळी प्रतिनिधी परळीतील स्वातंत्र्यसैनिक, कला योगी, चित्रकार दतात्रय दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजया दहिवाळ यांना कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नांवाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कै.उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने  राजेश भैय्या विटेकर दरवर्षी सामाजिक राजकीय क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी परळीच्या विजयाताई दहिवाळ यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने सामाजिक कार्याबद्दल विजया दहिवाळ यांना समाजभूषण पुरस्कार आमदार डाॅ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड ,जि.प.अध्यक्ष राजेश दादा विटेकर  यांच्या हस्ते देण्यात आला. विजया ताईंच्या गौ