प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी




परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)

         लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Click:■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे*


        लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, डॉ लक्ष्मण मुंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ पंढरी गुट्टे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.डॉ लक्ष्मण मुंडे, प्रा.प्रसाद देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा फुटके, आभार प्रा.प्रविण नव्हाडे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Video News 


•••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या