दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 परळीतील सामाजिक क्षेत्रातील कार्यतत्पर युवक हरवला;अजय पुजारी यांचे  निधन



परळी/प्रतिनिधी
         परळीच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यतत्पर सेवाभावाने कार्यरत असणारा युवक व सर्वपरिचित दैनिक मराठवाडा साथी चे कर्मचारी अजय पुजारी यांचे मंगळवारी (ता.१२) रात्री दहा च्या सुमारास निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे (वय-४३) वर्षे होते. परळी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा कायम सहभाग असायचा.
        परळी शहरातील खंडोबाल्ली,गणेशपार येथील  रहिवाशी  अजय पुजारी हे मागील वर्षभरा पासुन आजारी होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता.१२) रात्री १०:०० च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभुमीत बुधवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.
         गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरात सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणारा व सतत क्रियाशील युवक म्हणून अजय पुजारी यांची ओळख होती. जुन्या गावभागातील गणेशपार विभागातील रहिवासी असलेले अजय पुजारी हे अतिशय मनमिळावू कार्यतत्व व  सुस्वभावी म्हणून परिचित होते. त्यांचा समाजातील सर्व क्षेत्रात दांडगा जनसंपर्क होता. परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची सेवाभावी वृत्ती व सामाजिक कार्यातील क्रियाशीलता याची दखल घेऊन त्यांना  परळी भूषण विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने पुजारी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !