अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी

  अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी



परळी -  सोलापूर येथे घेण्यात आलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत Level-1 मध्ये  येथील संस्कार प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. अनघा लक्ष्मी सूर्यकांत नावंदे हिने चॅम्पियन पारितोषिक प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिच्या या घवघवीत यशाबद्दल पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे  शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी तांदळे , शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.             

"शाळेत मागील तीन वर्षापासून इयत्ता पहिली पासून अबॅकसचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, कल्पनाशक्ती, तार्किक क्षमता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता इत्यादी मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे."

       -दीपक तांदळे परळी



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!