शिरसाळा येथील एक जण मृत्युमुखी

 माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात मोटारसायकल अडकुन एकाचा मृत्यू




माजलगाव.....


माजलगाव तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये मोटर सायकलचे चाक अडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

        खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी या महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये दररोज मोटरसायकल चोरांच्या मोटर सायकलचे चाक अडकून अपघात होण्याच्या घटना घडत असतात. मंगळवार रोजी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी अब्दुल हाफिज सत्तार खान ( ४९) हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपा समोर त्यांची मोटार सायकल एम.एच.३८ ए ७२१८ चे चाक भेगांमध्ये अडकल्याने मोटरसायकल जागेवरच पलटी झाली. या त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ही जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले.


Click:■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे*

Video News 


•••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार