जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान

 जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान



 परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दिल्ली येथील राजनीति व प्रशासनाचे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध जनहित याचिकाकर्ता  सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ  अश्विनी कुमार उपाध्याय यांचे आज रोजी वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.

'' भारतीय राजनीति व प्रशासन यात अमुलाग्र बदलाची आवश्यकता'' एक संवाद असा विषय घेण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री बाजीराव भैया धर्माधिकारी हे असून माननीय राजेश देशमुख यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा, भास्कर मामा चाटे सामाजिक कार्यकर्ते, विनोद  सामत चेअरमन वैद्यनाथ बँक , रवी सानप पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन,  जुगलकिशोर लोहिया माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, जेष्ठ विधिज्ञ वैजनाथ नागरगोजे, जेष्ठ विधिज्ञ राजेश्वर देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. 

    तरी अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानासाठी आपण ऊपस्थिती रहावे असे आवाहन प्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा,  दंत रोग तज्ञ डॉक्टर दे. घ.मुंडे,परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे ,डॉक्टर विवेक दंडे, युवा नेते श्रीरामजी मुंडे, प्राचार्य रमेश राठोड, विलासराव मुंडे,डॉक्टर शिवकांंत अंदुरे ,यांनी केलेले आहे याच वेळेस आत्मलिंग शेटे यांच्या परळी समाचार दीपावली विशेष अंकाचे प्रकाशनही सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम वैद्यनाथ औद्योगिक वसाहत येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आलेले आहे.

 अश्विनी कुमार उपाध्याय यांनी जनहित याचिकाकर्ता म्हणून दिल्लीमध्ये नाव गाजवलेले आहे त्यांना पीआयएल मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. अशा या राजनीती  चे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध एडवोकेट अश्विनी कुमार उपाध्ये यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार