प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

 विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


परळी प्रतिनिधी

परळीतील स्वातंत्र्यसैनिक, कला योगी, चित्रकार दतात्रय दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजया दहिवाळ यांना कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नांवाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कै.उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ

माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने  राजेश भैय्या विटेकर दरवर्षी सामाजिक राजकीय क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.

यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी परळीच्या विजयाताई दहिवाळ यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने सामाजिक कार्याबद्दल विजया दहिवाळ यांना समाजभूषण पुरस्कार

आमदार डाॅ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड ,जि.प.अध्यक्ष राजेश दादा विटेकर  यांच्या हस्ते देण्यात आला.

विजया ताईंच्या गौरव पूर्ण सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असुन या पुरस्कारामुळे विजया ताईंचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या