भेल स्कूल मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

भेल स्कूलमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे   जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद 

 लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती प्रतीवर्षी उत्साहात विविध उपक्रमाने सर्वदूर साजरी होत असते. याही वर्षी परळी शहरातील नामांकित व सर्वात जुनी असणारी भेल सेकंडरी स्कूल, या विद्यालयात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची सुरुवात आज विद्यालय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेऊन करण्यात आली. इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी "ग्लोबल वॉर्मिंग " व 9वी ते 10वी या गटासाठी "संघर्षयोद्धा" हे विषय ठेवले होते.  वरील विषयांवर विद्यार्थ्यांनी तयारी करून,आपला प्रभावी सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवून- आपला ठसा उमटवला.या स्पर्धेमध्ये एकूण 50 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण, 12 डिसेंबर म्हणजेच साहेबांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते जाहीर होईल. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील अनुभवी व उत्कृष्ट शिक्षक श्रीमान जयंत अयाचित सर व उत्कृष्ट सहशिक्षिका सौ, सुमेधा कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे नियोजन कलोपासक मंडळाने केले व सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या प्रसिद्धीची जबाबदारी श्री. उदय वैजनाथराव देशमुख सर यांनी सांभाळली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार