अभिनंदनीय: राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड

 विभागीय स्केटींग स्पर्धेत कु. भार्गवी कराडला 3 सुवर्ण पदक


राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची नामवंत खेळाडू कु. भार्गवी नामदेव कराड हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विभागीय कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विभागीय स्केटींग स्पर्धेमध्ये तब्बल 3 सुवर्ण पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली. कु.भार्गवी हीने आजवर अनेक स्केटींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत गौरवास्पद यश मिळविले आहे. ज्ञानदा इंग्लिशन स्कूलमध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या भार्गवी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींग स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानस केला आहे. तीचा हा मानस पूर्ण करण्यासाठी भार्गवी दिवसरात्र मेहनत घेत आहे. अगदी कमी वयात भार्गवीने मिळविलेले यश कौतूकास्पद असून आगामी काळात देखील अशा प्रकारचे यश ती नक्कीच मिळवेल आणि यासाठी आमचे आशिर्वाद तीच्या सोबत असल्याचे भार्गवीच्या आई-वडील यावेळी सांगितले. हे सुवर्ण यश मिळविण्यासाठी ज्ञानदा शाळेचे मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, भाटकर स्केटींग अकॅडमीचे कोच अजय भाटकर, सोनिया भाटकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पुणे येथील एलएक्सटीचे कोच राहूल राणे यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. या यशा बद्दल क्रिडा विश्वातून भार्गवीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार