सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर

 सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या 23 व्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठेचा 2023 राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन अरविंद सौंदळे सर यांना जाहीर झाला असून  रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सोनपेठ येथे एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

सोनपेठ येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या वितरण सोहळ्यास अनेक गुरूवर्य शिवाचार्य महाराज तसेच विशेष उपस्थिती म्हणून परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,सोनपेठ चे तहसीलदार श्री.सुनील कावरखे,मुख्याधिकारी कोमल सावरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अंधारे,महाराष्ट्र वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी,वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त जेष्ठ नेते विजयकुमार मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे हे राहणार आहेत.

 या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदीकेश्वर मठ संस्थान,सोनपेठच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !