मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -आवाहन

 मनोज जरांगे पाटील यांची अंबाजोगाईत सभा :परळी वैजनाथ ते सभास्थळ निघणार मोटार सायकल रॅली



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    मनोज जरांगे पाटील यांची अंबाजोगाईत सभा होणार असुन या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ ते सभास्थळ  मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
          सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वा. अंबासाखर कारखाना (वाघाळा) अंबाजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजी मंडई, गणेशपार रोड परळी वैजनाथ ते सभास्थळ मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.दि11/12/2023 वेळ: दुपारी 3 वा.रॅली निघणार आहे.बाबा रामदेव मंदिर - लक्ष्मीबाई टॉवर मोंढा मार्केट- एकमिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक मार्गे अंबाजोगाई येथील सभेकडे रॅली जाणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक,सकल मराठा समाज परळी वैजनाथ तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !