शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती

 केंद्रीय पथकाकडून जिल्हयातील दुष्काळाची पाहणी



शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती

   बीड, दि. 14 (जि. मा. का.)खरिप हंगामात झालेला कमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच भुजल पातळीत झालेली घट व संभाव्य पाणी टंचाई यापार्श्वभुमीवर केंद्रीय पथकानी आज बीड जिल्हयात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थ्ा व अधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली.

        पथकाने जिल्हयातील बीड, वडवणी धारुर तसेच शिरुर कासार मधील अनेक ठिकाणी भेट दिली. केंद्रातील  कृषी सचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्हयात आले होते.  

        या पाहणी दौ-यात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे परविक्षाधीन भा.प्र.से.अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर,  तहसीलदार सुहास हजारे आदिंची उपस्थिती होती. 

      या पथकाने बीड तालुक्यातील घोडका राजूरी तसेच वडवणीतील पोखरी, ढोरवाडी, वडवणी, चौफलदरी तांडा, मोरवड, पुसरा, धारुरमधील भोपा, शिरुरमधील मालकाची वाडी, हिवरसिंग, खोकरमोहा, रायमोहा आदि गावात पिकांची तसेच पाझर तलाव व साठवण तलावांची पाहणी केली व शेतक-यांचे म्हणने ऐकुन घेतले. 

      जिल्हयाजत वार्षिक सरासरीच्या 79 टक्के इतकाच पाऊस पडला असून संपूर्ण पावसाळयात केवळ सरासरी 3.5 दिवस पावासाचे राहीले.

    यावर्षी कमी पावसाने कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सरासरी उत्पनन् कमी होण्याची शक्यता आहे. 

       

        या दौ-याची सुरुवात खोडका राजूरी येथील पाझर तलाव पहाणीने झाली. हा पाझर तलाव आटला असून या ठिकाणी असणा-या विद्यमान स्थितीची आणि संभाव्य पाणी टंचाईची माहिती पथकाला यावेळी देण्यात आली. त्यानंतर पोखरी येथील शेतकरी काशिनाथ काळे यांच्या शेतातील कापूस पिकाची पहाणी पथकाने केली. काळे यांच्या शेतात पावसाअभावी कमी असण्याची शक्यता दिसून आली. 

     या नंतर वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथेही पथकाने शेतातील कापसाच्या पिकाची पहाणी केली. शेळी व म्हशीच्या गोठयाची पाहणी करताना पथकाने उपलब्ध चारा आणि जनावरांसाठीचे पाणी याबाबत विचारणा केली. तांडयावर पिण्यास पाणी असले तरी जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही असे राठोड यांनी यांनी यावेळी सांगितले. 

        

अधिका-यांची बैठक

 

      या दरम्यान यंथील विश्रामगृहावर शेतक-यांसाठी विविध यंत्रणा करित असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच इतर यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

  या पाहणी पथकात केंद्रीय कृषी उपसचिव के. मनोज, निती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मिणा, विधी विनीयोग विभागाचे जगदिश साहू आदींचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !