इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव

 नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील नैसर्गिक सानिध्यात असलेला एकमेव जॉगिंग ट्रॅक आहे. नगर परिषदेने येथे तात्काळ हायमास्ट लॅम्प बसवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केली आहे.

 वैद्यनाथ महाविद्यालयाच्या या जॉगिंग ट्रॅकवर परळी शहरातील युवक - युवती दररोज विविध प्रकारचे खेळ खेळतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मैदानात सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी वयोवृद्ध महिला व पुरुष मंडळी पण बहुसंख्येने येत असतात. परंतु या मैदानाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने  जॉगिंग ट्रॅक वर येणाऱ्या युवकांसह नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी सोबतच सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. त्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवेश्वर कॉलनीतील वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर नगर परिषदेने हायमास्ट लॅम्प तात्काळ बसवावेत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या