अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता; फसवेगिरी करणाऱ्यांकडून होणार सक्त वसुली - धनंजय मुंडे



अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच


नागपूर (दि. 15) - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यीतअत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 


अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ.अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल श्री मुंडे बोलत होते. 


अकोला जिल्ह्यात सदर योजनेतून ट्रॅक्टर व औजारे खरेदीच्या अनुदानासंदर्भात ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याचा तपास सखोल पद्धतीने करण्यात येत असून, यातील दोषींवर सक्त वसुलीसह आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार देखील करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास आता योजनेचे स्वरूप देण्यात येणार असून, आजवर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली येण्यास तसेच समूह शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यास ही योजना मार्गदर्शक ठरली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित करणार येणार असल्याची माहिती, उपस्थित लक्षवेधीच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार