इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप

 टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप



        बीड, दि. 14 (जि. मा. का.) बीड: शहाजानपूर रुई येथील रहिवाशी कै. प्रमिला श्रीराम घुमरे यांचा हृदय विकाराचा झटक्यामुळे दि. 3 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन बिमा दि. 12 मार्च 2020 रोजी घेतला होता.त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांचे पती श्रीराम अशोक घुमरे यांना टपाल जीवन बिमा योजनेतून रु.११०८५२५/- रुपयांचे धनादेश अधीक्षक डाकघर, बीड विभाग बीड डी.आर.शिवणीकर, अधीक्षक डाकघर बीड विभाग,बीड यांच्या हस्ते हेड पोस्ट ऑफिस येथे दि. 11 डिसेंबर 2023 रोजी वाटप करण्यात आला.

         डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी चागली आहे.या योजनेत हफ्ता कमी व लाभ जास्त मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी यांना दहा लाखाचा तर सरकारी कर्मचारी,डॉक्टर, इंजिनिअर, NSE/ BSE यांचे कर्मचारी यांना देखील पन्नास लाखा पर्यंत चा विमा घेता येतो. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान डी.आर.शिवणीकर डाकघर बीड विभाग बीड यांनी केले आले. यावेळी पोस्टमास्तर एच.एस.पानखडे व पोस्टाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!